Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप यादव यांचे निधन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा परिषदेचे वीर भिवडी तालुका पुरंदर गटाचे माजी सदस्य तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख दिलीप सोपानराव यादव( वय 65) यांचे निधन झाले. श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सण १९९३ मध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात केली, तसेच सण २००२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने वीर भिवडी गणातून पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली, त्यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून, पुरंदर तालुकाप्रमुख पदावरून, पक्षाच्या कामाला सुरुवात केली, ते 2012 मध्ये भिवडी गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते, तसेच 2017 मध्ये वीर भिवडीे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते, माजी राज्यमंत्री तसेच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी म्हणून, तसेच राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख त्यांची होती, त्यांच्या पश्चात मागे पत्नी, मुलगा, मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments