पुरंदर तालुक्यातील सासवड येथे 24 डिसेंबर ग्राहक दिन साजरा ;तर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय पुरंदर व ग्राहक हक्क संरक्षण क्षेत्रातील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन प्रशासकीय इमारत सासवड येथे मोठ्या उत्साहात पार पडले, या उपक्रमास नागरिकांना त्यांच्या ग्राहक हक्क विषयी माहिती देणे व ग्राहक संरक्षण कायद्याची सखोल माहिती उपलब्ध करून देणे हा होता, दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून, कार्यक्रमास सुरुवात झाली, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत यांनी केले. प्रास्ताविक मध्ये तहसीलदार यांनी ग्राहकांना आपल्या हक्काबद्दल, जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच ग्राहक चळवळीतील संघटना यांना ग्राहक हितासाठी कार्य कक्षेमध्ये विस्तारित करण्याचे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य विकास महाजन यांनी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्याबाबतची पार्श्वभूमी सांगून, सन 2025 च्या राष्ट्रीय ग्राहक दिन, थीम डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्रम आणि जलद निपटारा या संकल्पनेचे विस्तृत स्पष्टीकरण केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक व हरिभक्त परायण तुकाराम महाराज निंबाळकर यांनी ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा व त्यांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक हक्क संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महेश राऊत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर तालुका अध्यक्ष प्रसाद अत्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पत्रकार व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटक गिरीश झगडे, ग्राहक कल्याण फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष रामदास मेमाणे यांची विशेष उपस्थिती यावेळी होती, याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसील कार्यालय व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक, सदस्य, स्वस्त धान्य दुकाना आधार सह यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे मार्गदर्शक संतोष काकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राज्य सचिव संतोष मगर यांनी केले .यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे कोषाध्यक्ष उत्तमराव झेंडे, जिल्हाध्यक्ष संतोष कामठे, कार्याध्यक्ष सुभाष काळे इत्यादी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयाच्या वतीने अशा प्रबोधनात्मक उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला, ग्राहक हक्काची जाणीव निर्माण करणारी ही कार्यशाळा यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले, ग्राहक दिनाची सर्व माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सर्व प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments