Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भिवरी कोंढवा रोडवर अपघातांची मालिका सुरूच... सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड कोंढवा रोडचे काम नव्याने चालू असल्यामुळे, सदर रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारचे गतिरोधक, तसेच सूचनाफलक नसल्यामुळे, वाहनांचा वेग अतिशय वाढलेला आहे. त्यामुळे भिवरी परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रोज गंभीर, तसेच किरकोळ अपघात होत आहेत. आणि यात अनेक लोकांना गंभीर दुखापत, तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांना रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक आणि भिवरी,बोपगाव, चांबळी व हिवरे या शाळांच्या समोर सूचनाफलक व गतिरोधक टाकण्यासंबंधी दिलीप (आप्पा) कटके भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष पुरंदर तालुका तसेच माजी सरपंच भिवरी यांनी विनंती केली आहे अशी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments