श्रीनाथ म्हस्कोबा वीर यात्रेच्या बारा दिवसाच्या काळामध्ये प्रशासनाच्या वतीने नियोजन व पूर्णपणे मदतीचे सहकार्य राहील; उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा सोहळा दि. 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत असणारी, 12 फेब्रुवारी रोजी मारामारी म्हणून रोजी संपन्न होणार आहे, तर देवाचे लग्न 1 फेब्रुवारी रोजी वीर येथे संपन्न होणार आहे, या सोहळ्यासाठी पुणे जिल्हा व पुणे जिल्हा बाहेरून लाखो भाविक भक्त सोहळ्यासाठी व देवदर्शनासाठी येत असतात, सदर श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा सोहळा सुरळीत, पार पडावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित रावी म्हणून, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित प्रशासकीय विभागाची नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय पुरंदर येथे दि. 24 जानेवारी रोजी 12 वाजता नियोजन बैठक संपन्न झाली. देवाची हळद दि. 31 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता राऊत मंडळी समवेत, देवाला हळद लावली जाते, दि. 1 फेब्रुवारी रोजी माध्य शुद्ध पौर्णिमा या दिवशी कोडीत येथील काठी पालखी संध्याकाळी सात वाजता वीर येथे वाजत, गाजत, देवाची धूप आरती करून मानकरी, पुजारी, सालकरी, देवस्थान विश्वस्त ,भाविक, ग्रामस्थ हे पालखी आणण्यासाठी जातात, त्यांची भेटाभेट होऊन, पालखी आपली तळावर स्थापन होते, रात्री साडेदहा वाजता राऊत मंडळांच्या वतीने देवाला पोशाख करून,मंडोळ्या बांधल्या जातात, रात्री अकरा वाजता कोडितची पालखी घेऊन बाहेरून, वीरची पालखी देवाचे मानकरी, सह फुलांच्या माळा घातल्या जातात, वाईची पालखी (सूर्यवंशी) व कनेरी (पाटणे) ची काठी यांची भेटाभेट होऊन, पालख्या भाविकासह देऊळ वाड्यात येतात, एकूण सात पालख्या मंदिरात असतात, रात्री एक ते दीडच्या दरम्यान, देऊळ वाड्यात व परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते, लग्न झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा होऊन, सर्व पालख्या काठीसह तुकाई देवी मंदिराकडून ग्रामप्रदक्षिणेसाठी जातात, पहाटे साडेपाच वाजता सर्व पालखी पुन्हा देऊळवाड्यात येतात व प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या जागेवर स्थापन होतात, तत्पूर्वी एसटी महामंडळ, आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, बीएसएनएल, कृषी विभाग, पंचायत समिती, विद्युत मंडळ नगर परिषदेचा या सर्वांच्या यात्रा काळातील देवाची लग्ना अगोदरच्या सर्व प्रशासनाच्या सेवेवरती असणाऱ्या उपाययोजनावर नियोजन व आढावा बैठकीत योग्य त्या सूचना देण्यात आल्या, सध्या निवडणुकीचा धामधुम चालू आहे, आचारसंहितेचा कुठलाही भंग करू नये, यात्रा काळात पाणी, तंबू उभारण्यात येणारे स्वच्छता याबाबत काटेकोरपणे लक्ष देऊन, सुविधा द्याव्यात कायदा सुव्यवस्थेचा पालन वाहतुकीचा प्रश्न पोलीस प्रशासन यासाठी कायदा सुव्यवस्थेच्या कुठलाही असल्याचेही सांगण्यात आले, ग्रामसेवकांच्यासाठी यात्रा काळात स्वच्छता, देवस्थान कचरा उचलून, घंटागाडी 10 ते 12 दिवस यात्रा काळात ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले, जर कुठलाही वीर यात्रा काळाच्या ठिकाणी बॅनर लावल्यानंतर, आचारसंहितेचे पालन करावे तसे झाले नाही तर कडक इशाराही विक्रम राजपूत यांनी ग्रामसेवकांना दिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने असणारे खड्डे भरून काढणार आहेत, एकही खड्डा राहणार नाही, आज पासूनच सुरुवात करत आहे, कोडितीत येथील खड्डे पूर्णपणे भरले जातील, सासवड कोडीत येथील स्पर्धेतील गतिरोधक सुद्धा सुरळीत करून, होणारे अपघातापासून संरक्षण केले जाईल, याबाबत सगळी यंत्रणा कामाला लावली जाईल, एसटीची सेवा दिली जाईल, भाविक भक्तांनी पालखी वीरला पोहोचल्यानंतर एसटीने हरणे वाल्हे एक फेब्रुवारीला प्रवास सुरळीत करावे, एसटीची जागा निश्चित करावी, नगरपरिषदेकडून योग्य ती सोय करण्यात यावी, टॉयलेटचा मेंटनस होत नाही, पाणी, स्वच्छता, विद्युत अशा प्रकारचा एक फेब्रुवारीला एसटीची सोय करावी, मारामारी नंतर सुद्धा वीर येथून कोडीतला एसटी चालू करावे, बैलगाडा ही आमची यात्रा, शौकीन सहकारी बुलेट गाडीवर फटाक्यांचा आवाज करत जाणे, प्रचंड आरडा ओरड करणे, वेडे वाकडे चाळे करीत रात्री अपरात्री दिवसा शांतता भंग करत जाणे, असा एक नवीन ट्रेड जो चालू आहे, त्यावर ताबडतोब बंद करावेत, नियमाचा भंग केल्यास बैल मालकावर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावेत, गुलालाची तपासणी करावी, हॉटेलचे अन्नपदार्थ चेकिंग करावेत, बैलगाडी हा असथेचाच विषय आहे, प्रत्येक गाडीला नंबर देणार आहेत, मिरवणूक यावर बंदी व दंड करावेत, सात ते आठ हजार वाहने येतात, त्याची नियोजन सुरळीत पार पाडावे, बगाडाला धार पाडताना त्या ठिकाणची असणारी सध्या तरी टपरी त्वरित काढावी, अशाही सूचना तसेच मारामारी यावेळी बगाडा शेजारी पोलीस बंदोबस्त द्यावा, व्यसनमुक्ती बॅनर यात्रा काळात वीर मध्ये लावले जावेत, त्याचे पालन हे झाले पाहिजे, वीर येथील यात्रा काळात बार पूर्णपणे बंद राहणार आहेत, असा नियोजन बैठकीत सूचना या कायदा व सुव्यवस्थेच्या पालन करून यात्रा शांततेत पार पाडली जावी यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे सहकार्य राहील असे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी बैठकीत सांगितले. प्रामुख्याने वर्षातून यात्रा मोठी विरची असते, तर प्रशासनाच्या वतीने पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी उपस्थित नव्हत्या, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते, आरोग्य विभागाचे , विद्युत मंडळ, एसटी मंडळ आदी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पाठवून ,अनुचित राहिले, याला फक्त सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी तथाप्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता प्रकाश निगडे, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश थोरात,वीर व कोडित येथील मंडलाधिकारी तलाठी,ग्रामसेवक, कोडित देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, आजी- माजी, सल्लागार मंडळ, वीर चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,आजी -माजी सल्लागार मंडळ, सालकरी, मानकरी, दागिनदार, पुजारी, ग्रामस्थ, पत्रकार शिवदास शितोळे, पत्रकार बापू मुळीक वीर ,कोडीत येथील बहुतेक बहुसंख्येने पदाधिकारी आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments