पुरंदर तालुक्यामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राजकारणात पैसेवाले यांचीच एट्री; तर सर्वसामान्य होतकरू युवक वेटिंग लिस्ट वर सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीने पुरंदर तालुक्याचे रन गाजत आहे, या निवडणुकीसाठी स्वतंत्र असा सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच दिसून आली असून, यामध्ये अनेक होतकरू युवकांना डावलले गेले आहे, बहुतांश ठिकाणी तर पैसेवाल्यांना आयात करून, उमेदवारी दिली गेली आहे, परिणामी होतकरू आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना अपेक्षाप्रमाणे तिकिटे मिळालेली नाहीत, त्यांना 'वेटिंग लिस्ट वर' समाधान मानावे लागलेले आहे, पुरंदर तालुक्यातील माळशिरस, बेलसर, दिवे, गराडे, वीर ,भिवडी, आणि निरा कोळविहीरे अशा जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समिती गणाची निवडणूक सध्या रंगात आलेली आहे, शिवसेना (शिदे गट) भारतीय जनता पक्ष व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व काँग्रेस असे चौरंगी लढतीचे चित्र तालुक्यात स्पष्ट झाले आहे ,सर्वच पक्षात इच्छुक उमेदवारांची रांग लागल्याने, कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही ?हा प्रश्न पुरंदर मधील सर्वच राजकीय पक्षासमोर उभा ठाकलेला आहे, यामुळे सर्वच पक्षांनी' वेट अँड वॉच ची' भूमिका घेतली होती, अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास दमछाक झालेली आहे, शेवटच्या क्षणी मात्र अनेक पक्षात बहुतांश ठिकाणी पैसेवाले उमेदवार पाहावयास मिळत असून, ऐनवेळी तिकीट न मिळाल्याने, इतर पक्षात तिकिटासाठी रांगच रांग दिसून आली, सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकांना मात्र तिकिटे मिळाली नाहीत, काहींना जिल्हा परिषदेवरून पंचायत समितीची उमेदवारी घ्यावी लागली, तर काही युवकांना अखेरपर्यंत वेटिंग लिस्ट मध्ये समाधान मानावे लागले, उमेदवार आणि पैसेवाले असा नियम सध्या दिसत असल्याने, सर्वच पक्षात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक दिसत आहे, 27 जानेवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे, या दिवसापर्यंत कोणता पक्ष आपल्या पक्षातील अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडेल, यावर पुढील राजकीय गणित व त्याची उत्तरे अवलंबून आहेत, तर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गणामध्ये ही निवडणूक 'हाय व्होल्टेज झालेली आहे 'जिल्हा परिषद गटामध्ये फक्त तिरंगी लढत ही जोरात होणार आहे, यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस तर राष्ट्रवादी व शिवसेना उंबाठा गटाला खूप झगडावे लागणार आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्याबाबत जो काही गुन्हा दाखल झालेला आहे ,त्याबाबत त्यांची त्या ठिकाणी गुन्ह्याच्या संदर्भातून त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणतीही स्थिती मिटवण्यासाठी स्थिती झालेली नाही, पाचवा उमेदवार उंबाठा गटाचे यांची सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना, बाकीचा पारदर्शक असा कोणताही कारभार बेलसर माळशिरस गणामध्ये झालेला नाही, फक्त नावासाठी व पैशाच्या जोरावरती ही निवडणूक लढवीत असून, त्यांच्याबद्दल खूप शंका, कुशंका या ठिकाणी मतदारसंघांमध्ये आहेत, फक्त त्या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक लढवून त्यांना मत मिळणं म्हणजे खूप अवघड झालेले आहे, विमानतळाच्या संदर्भात व सासवड सुपा रस्ता वरती रोडचे काम चाललेले या प्रश्नावर चौथा उमेदवार व पाचवा उमेदवार कोणत्याही प्रश्नावर शेतकऱ्याच्या अडीअडचणीवर कुठल्याही पाणी प्रश्नावर, या ठिकाणी बेलसर माळशिरस गणामध्ये कोणतीही प्रतिक्रिया चौथा व पाचवा उमेदवार देत नाही, त्यामुळे त्यांना निवडणूक ही एवढी सोपी नाहीये,खुप झगडावे लागेल पत्रकार यांची हेटाई करत आहेत हे उमेदवार याचा परिणाम सोसावा या उमेदवारांना अडचणी पत्रकार याच्या नाही सोडवल्या तरर परिणाम वेगळे होतील
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments