Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वीर भिवडी गटातील व गणातील भारतीय जनता पक्षाच्या वीर भिवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथील मंदिरात प्रचाराचा शुभारंभ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील व वीर गणातील उमेदवार भाजपचे यांच्या प्रचाराचा शुभारंभाचा माजी आमदार संजय जगताप व माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथील मंदिरात संपन्न झाला, श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील सांस्कृतिक हॉलमध्ये माजी आमदार अशोक टेकवडे बोलताना मनाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील भाजपचे उमेदवार प्रचंड विक्रमी मताने निवडून येणार आहेत, असे वक्तव्य माजी आमदार अशोक टेकवडे यांनी व्यक्त केले, कमळाचे चिन्ह हे पुरंदर तालुक्यातील घराघरात पोहोचवणे हे कर्तव्य समजून मतदान परावर्तित करून, प्रचाराचा शुभारंभ श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील चरणी सुरुवात करून, विजयात असेल म्हणून भाजपचे कमळ हे फुलवायचे आहे, त्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असून ,पुरंदर मधील या सर्व चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या गणासाठी सर्वसामान्य नागरिकांनी भरघोस मतांनी व विक्रमी मतांनी भाजपचे कमळ पुरंदर तालुक्यात फुलवायचे आहे असे माजी आमदार संजय जगताप यांनी आपले मत व्यक्त केले. वीर भिवडी गटातील उमेदवार हरिभाऊ लोळे यांनी सांगितले की, काम करत असताना, कोणतेही जात-पात न पाहता, सर्वांना सहमतीत घेऊन, अगदीच नम्र संयम पद्धतीने पंचायत समितीत कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असताना, काम केले आहे, त्याचाच भाग म्हणून त्यासाठी भाजपचेच कमळ फुलवायचे आहे, भाजपची जडणघडण हीच स्थिती महत्त्वाची आहे ह्या गटातील व गणातील मतदार हा कोणाच्या हाताला लागेल तो म्हणजे कमळ भाजपचे असे उदगार वीर भिवडी जिल्हा परिषद गटातील हरिभाऊ लोळे यांनी आपले मत व्यक्त केले. भिवडी गणातील सायली शिंदे व वीर गणातील सुधीर (आप्पा) धुमाळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले, संकेत जाधव, दिलीप धुमाळ, माऊली वचकल, शैलेश तांदळे, भूषण ताकवले, ऋतुजा जाधव, संतोष धुमाळ, कुंडलिक जगताप आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, कुंडलिक (भाऊ )जगताप ,शैलेश तांदळे, दिलीप धुमाळ, मंजुषा धुमाळ सरपंच, संतोष धुमाळ, अमोल धुमाळ, संजय (काका) निगडे, भूषण ताकवले सरपंच, तुषार माहुरकर, मनोज शिंदे, समीर भिसे, डॉक्टर सुमित काकडे तुषार (बंटी) जगताप वीर भिवडी गटातील व गणातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने हॉल फुलगच्च भरल्याने, उत्कृष्ट असे प्रचाराचा शुभारंभ झाला यासाठी प्रामुख्याने भिवडी गणातील सायली शिंदे, वीर गणातील सुधीर (आप्पा) धुमाळ वीर भिवडी गटातील हरिभाऊ लोले, पत्रकार, बहुसंख्येने श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात महिला, युवक वर्ग आधी उपस्थित होते. प्रास्ताविक अभिजीत धुमाळ यांनी केले, सूत्रसंचालन रुपेश धुमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय (काका) निगडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments