Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये गुरुवारपासून भजन स्पर्धेचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सहकार महर्षी स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त सासवड तालुका पुरंदर येथील संत सोपान काका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात भव्य भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, येत्या गुरुवार आणि शुक्रवारी दिनांक 29 व 30 जानेवारी या स्पर्धा होणार असल्याची माहिती सासवड सांस्कृतिक मंडळाचे सचिव रवींद्र पंत जगताप यांनी दिली सासवड सांस्कृतिक मंडळ भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षापासून या स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत यंदाही स्पर्धा खुला गट आणि लहान गट अशा दोन श्रेणीमध्ये पार पडणार आहेत पुरंदर हवेली येथील भजनी मंडळांनी या स्पर्धेमध्ये आपली कला सादर करावी ,असे आवाहन आयोजकांनी केले आहे ,या स्पर्धेमध्ये विजेत्या संघासह उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या गायक, हार्मोनियम आणि तबला मुद्रुक वादकांनाही विशेष अशी बक्षिसे देऊन सन्मानित केले जाणार आहे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक मंडळांनी बोपगाव भजनी मंडळ श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments