Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील शरद विजय 'चे संचालक मंडळ बरखास्त; तर 1 कोटी 45 लाख रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई प्रशासकाची नियुक्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद विजय'चे सोसायटीचे संचालक मंडळ 1 कोटी 45 लाख रुपयाच्या गैरव्यवहार प्रकरणी अखेर बरखास्त करण्यात आले असून, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी जयेश गद्रे यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे, सोसायटीचे दप्तर सुरक्षित रहावे आणि नवी समिती स्थापन करण्यासाठी ही कारवाई केली आहे, या कारवाईनंतर निदान आता तरी अपहाराच्या रकमेची पूर्तता केली जाणार का? याकडे लक्ष लागले आहे, शरद विजय विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गैर कारभाराबाबत वृत्त हे 27 ते 29 मे 2024 या कालावधीत ठोपावलेल्या भ्रष्टाचार नावाने वृत्त मालिका प्रसिद्ध केलेली असताना, यानंतर चौकशी होऊन ,निष्पन्न झालेल्या गैरव्यवहाराबाबत सचिव मंगेश सुभाष निगडे यास वैयक्तिकरित्या, तर बँकेचे दोन विकास अधिकारी, दोन माजी सचिव, यांना सामूहिक जबाबदारी धरले होते, तसेच आजी, माजी सं:चालक मंडळावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला होता, पुणे जिल्हा बँकेच्या निरा शाखे याद्वारे शरद विजय सोसायटी तब्बल 88 लाख 30 हजार रुपये अपहर आणि 57 लाख 38 हजार रुपये आर्थिक नुकसान असा एकूण 1 कोटी 45 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला होता, सहकारात नो एंट्री अपहाराच्या रकमा न भरल्या, सचिव बँकेचे अधिकारी व संचालक मंडळाला कायदेशीर कारवाईला तर सामोरे जावे लागणारच आहे, तसेच तूर्तास तरी ते दोषी आढळलेल असल्याने, सहकार कायद्यानुसार सोसायटीच्या येऊ घातलेल्या, पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी सपेपर्यंत कुठल्याही सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहेत, सहकार खात्याच्या आदेशानुसार प्रशासकाचा कालावधी सहा महिन्याचा असून, त्यांना तातडीने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावून, नव्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे, याप्रकरणी सभासद रणजीत निगडे व अन्य 106 सभासदांनी निष्पक्ष चौकशीसाठी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी 25 मार्च 2025 रोजी केली होती, यावर थेट सप्टेंबर मध्ये सुनावणी झाली, आता थेट जानेवारीत उशीर का? होईना सहकार विभागाने शेतकऱ्याची मागणी पूर्ण केली आहे, मूळ दप्तरात खाडाखोड होण्याची किंवा कागदपत्रे गाळ होण्याची शक्यता, गृहीत धरून ही पुणे जिल्हा बँकेचे नायगाव शाखेचे शाखाधिकारी जयेश गद्रे यांची प्रशासक म्हणून, नियुक्ती केली आहे, अपहाराबाबत जेजुरी पोलिसांना ही तक्रार करण्यात आली होती, फौजदारी कारवाई टाळण्याच्या उद्देशाने, अपराच्या रकमांची जमा जमवू सुरू करण्यात आली होती, सुमारे 37 लाख 50 हजार रुपये संस्थेच्या खात्यावर भरण्यात यशही आले आहे, मात्र सदर काम अर्धवट ठेवल्याने, आणि आता संचालक बरखास्ती झाल्याने, पुढील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments