पुणे जि. प. सी. ई .ओ . गजानन पाटील यांनी केली वचनपूर्ती !सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 8 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गुरोळी येथे गजानन पाटील यांनी भेट देऊन, विविध विकासकामांचे उदघाटन केले होते . त्यावेळी त्यांच्यासोबत यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी , उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर जि. प उप मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी , गटविकास अधिकारी श्रीम . प्रणोती श्रीश्रीमाळ यांचीही उपस्थिती होती . अभियानातील विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते .गावातील कचरा विभागणी ओला व सुका कचरा अश्या पद्धतीने होत असून, कचरा गोळा करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याबाबबत गुरोळी ग्रामस्थांनी गजानन पाटील यांच्याकडे समस्या मांडली .त्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले होते . तश्या सूचना त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांना दिल्या होत्या .काल दि. 9 जानेवारी रोजी लोणी काळभोर येथे जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातू 13 घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले . प्रत्येक तालुक्यातील एका गाव निवडून घंटागाडी सुपूर्त करण्यात आली . पुरंदर तालुक्यातून गुरोळी गावाची निवड करून गजानन पाटील यांनी दिलेला शब्द तर पळालाच पण गुरोळी ग्रामस्थांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला . केवळ 30 दिवसांत आपला शब्द सत्यात उतरवून आश्वासन पूर्तता केल्याबद्दल गुरोळी ग्रामस्थांनी पाटील यांचे आभार मानले . घंटा गाडी ही इलेक्ट्रॉनिक गाडी असून तिची किंमत 11.50 लक्ष इतकी आहे . गाडीचा वापर कसा सुरु आहे, हे पाहण्यासाठी मी अचानक भेट देणार आहे, अशी सूचना देखील त्यांनी ग्रामसेवकांना केली . चौकट -यापूर्वी पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव म्हणून कार्यरत असताना, त्यांनी गुरोळी पाझर तलाव दुरुस्ती साठी 72 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला होता . मागील वर्षी तलाव दुरुस्ती पूर्ण झाली असून, त्यामध्ये 28 कोटी लिटर इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे . या तलावाचा फायदा गुरोळी, सिंगापूर , पारगावच्या शेतकऱ्यांना होतो .पाटील साहेबांनी सर्व ग्रामस्थाना सुखद धक्का दिला असून, आता परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत ग्रामस्थ म्हणून आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली आहे .रेणुका खेडेकर ,सरपंच गुरोळी यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments