पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी रस्ता दुरुस्ती कामाची पाहणी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतातील पहिली UCI 2.2 दर्जाची आंतरराष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धा 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' च्या निमित्ताने पुणे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, पुणेच्या वतीने सरदार गोदाजीराजे चौक ते शिवतीर्थ चौक या मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम जोरात सुरू असून, हे काम स्पर्धेच्या मार्गाच्या तयारीचा भाग आहे.या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी भेट दिली. यावेळी भाजपा उपाध्यक्ष उदयराज जगताप, येथील व्यापारी तथा नागरिक दिलीपनाना जगताप, मनोज जगताप, शंकरनाना क्षीरसागर, पंकज शेवते, राजेंद्र बोत्रे, मयूर गिरमे, अजय भोंडे, निरंजन फडतरे, ढवळे दादा यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.आनंद जगताप यांनी कामाची गुणवत्ता तपासली आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय दर्जानुसार रस्ते वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याचे त्यांनी कौतुक केले.'पुणे ग्रँड टूर २०२६' ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणार असून, जगभरातील ३५ पेक्षा अधिक देशांतील १७१ सायकलपटूंचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेमुळे पुणे शहर जागतिक क्रीडा नकाशावर झळकणार असून, शहरातील पायाभूत सुविधांना चालना मिळेल.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments