पुरंदर तालुक्यातून स्टेज टू व स्टेज थ्री साठी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी बजाज पुणे ग्रँड टूर मार्गावर स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवावी: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग हा गावाचेही टूर असे, चित्र वाहिनी द्वारे, जागतिक अशा पातळीवर थेट प्रक्षेपण हे होणार असून, हे सर्व दृश्य देश- विदेशात पोहोचणार असून, याद्वारे एक प्रकारे पर्यटनाला चालना, तसेच स्थानिकांना रोजगार व पर्यायाने गावाचे सक्षमीकरण, होण्यास मदत होणार आहे ,त्यासाठी प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता कशी राहील, या दृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेऊन सूक्ष्म, असे नियोजन करावे, त्यासाठी स्थानिक नागरिक, लोक प्रतिनिधी ,सोसायटीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील छात्र सेना ,राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी अशा विविध घटकांनी मिळून, ही टूरवर स्वच्छता मोहीम ही राबवावी असे, आव्हानही जितेंद्र डुडी यांनी केले आहे. सासवड ता. पुरंदर येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप, शिवसेना (शिदे गट) तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) वर्षा लांडगे, तहसिलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अनुराधा भंडारी, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, वनविभाग अधिकारी सागर ढोले, निवासी नायब तहसिलदार संदीप पाटील, क्रीडा शिक्षक निलेश जगताप, सार्वजनिक बांधकाम अधिकारी प्रकाश निगडे, पत्रकार बांधव, पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध गावचे आलेले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, रेशनिंग दुकानदार, शाळेचे विद्यार्थी, सामान्य नागरिक आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डुडी यावेळी म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता, प्रशासनाच्या वतीने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असे ,रस्ते तयार करावेत, पुरंदर मधील मधल्या वेळेमध्ये खूप तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात व ठेकेदाराच्या संदर्भात सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत, त्यावर सुधारणा ही झालीच पाहिजे ,त्यासाठी आपल्या गावामध्ये, परिसरात नैसर्गिक सौंदर्य, पर्यटन स्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोचवण्यासाठी हीच आता संधी आहे, यासाठी टप्प्या अंतर्गत येणाऱ्या, गावात खेळाडू आल्यास स्वयशिस्त अशी पाळावी, हा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की, त्यासाठी संगीत, वेशभूषा, नाटक, पथनाट्य ,लोकनाट्य, आधी माध्यमातून द्वारे आपण सर्वांनी स्वागत करावे, स्पर्धेवेळी नागरिकांनी, ग्रामस्थांनी स्पर्धेच्या मार्गावर बाजूला उभे राहून, खेळाडूचा उत्साह वाढवावा, यावेळी स्पर्धेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव असे प्राणी येऊ देऊ नयेत ,याबाबत योग्य अशी दक्षता, खबरदारी घ्यावी, ही स्पर्धा पुण्यातील ग्रामीण जीवनाची, सह्याद्रीच्या, डोंगर दर्याची ओळख व्हावी, पुण्याचे निसर्ग सौंदर्य जगाला जवळून पाहता यावे, यासाठी 40 देशाची जनता ही बजाज टूर लाईव्ह बघणार आहेत, पुरंदर मधील असणारी अस्वच्छता, ही आतापासूनच सुरुवात करून, स्वच्छता करायची आहे ,त्यासाठी सासवड नगरपरिषद, ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा सहभाग ,हा महत्त्वाचा आहे ,पुणे परिसरात पर्यटनाला चालना मिळावी, पुण्याची ओळख ही जागतिक स्तरावर उच्च ठरणार असून, यासाठी पुरंदर मधील सर्वांनी म्हणजे प्रामुख्याने ,आमदार, माजी आमदार, सर्वच पदाधिकारी यांनी एक जुटीने येऊन, नागरिक, पत्रकार ,यांनी हा आनंद हा द्विगुणीत व्हावा, यासाठी स्पर्धेतील अनुभव हा स्पर्धकासाठी आयुष्यभराची आठवण ही ठरणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ,ही स्पर्धा यशस्वी करण्यास करिता, सर्वांनी सहकार्य करावे, जिल्ह्यातील नागरिकासाठी हा देखील एक अविस्मरणीय क्षण असा असणारा आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले .बुधवार दि. 21 रोजी स्टेज टू साठी भिवरी ,चाबळी, कोडीत बुद्रुक, नारायणपूर,चिवहेवाडी, देवडी, केतकावळे तर गुरुवार दि. 22 रोजी स्टेज थ्री साठी सासवड, सुपे, पानवडी, काळदरी, मांढर ,माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे, पिसुर्डी, निरा असा पुरंदरचा सर्वात जास्त किलोमीटरचा अंतर असलेला भाग आहे, यासाठी सासवड नगरपरिषद, नवीन प्रशासकीय इमारतीमधील प्रांत विभाग, तहसीलदार विभागाने यासाठी पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बैठकीचे नियोजन हे सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये जिल्हाधिकारी यांच्या बैठकीचे नियोजन केले होते. आभार प्रदर्शन सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments