Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर जगताप भाजपचे तर स्वीकृत भाजपचे नगरसेवकपदी मयूर चौखंडे तर शिवसेना शिंदे गटाचे सचिन भोंडे नगरसेवक पदी निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपचे सासवड नगरपरिषदेवर वर्चस्व हे नगराध्यक्षासह 13 नगरसेवक/ नगरसेविका म्हणून वर्चस्व स्थापित झाले असताना, शिवसेना (शिंदे गट) 9 नगरसेवक/ नगरसेविका म्हणून निवडून आल्या असताना, आज सासवड नगर परिषदेत आनंदी (काकी) जगताप नगराध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती, त्यामध्ये भाजपच्या वतीने मनोहर( तात्या) न्यानोबा जगताप प्रभाग क्रमांक एक मधून ब गटातून उमेदवारी अर्ज भरला होता, तर शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ अ मधून प्रितम (पप्पू )सुधाकर म्हेत्रे 9 मते यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला होता, त्यामध्ये भाजपचे मनोहर( तात्या) न्यानोबा जगताप 13 मतांनी उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याचे नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप व सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे मयूर चंद्रकांत चौखंडे यांची नगरसेवक पदी निवड झाली, तर शिवसेना (शिंदे गटाचे) सचिन दामोदर भोडे यांची नगरसेवक पदी निवड जाहीर झाल्याचे त्यांनी केले.तसेच भाजपच्या अजित( हापूकाका) जगताप यांची गट नेते पदी तर शिवसेना (शिंदे गटाच्या) मंदार गिरमे यांची गट नेते पदी निवड जाहीर झाल्याचेही केले. यावेळी माधुरी राऊत, शीतल भोंडे, ज्ञानेश्वर (माऊली काका) जगताप, स्मिता सुहास जगताप, सोपान रणपिसे, रत्ना म्हेत्रे, मंदार गिरमे, अर्चना (बंडू काका) जगताप, राजन (भैय्या) जगताप, स्मिता उमेश जगताप, वैभव (राजाभाऊ) टकले, दिपाली जगताप, प्रदीप (बंडू) राऊत, प्रियांका जगताप, ज्ञानेश्वर (आबा )गिरमे, शिल्पा जगताप, हेमलता इनामके, अजित (हापू काका) जगताप, आजी, माजी, नगरसेवक/ नगरसेविका, सासवड मधील नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, सामान्य नागरिक, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते .यावेळी माजी आमदार संजय जगताप यांनी उपनगराध्यक्ष, दोन्ही नगरसेवकाचा सत्कार केला. नुतन उपनगराध्यक्ष मनोहर जगताप म्हणाले की, सर्वांना सहमतीत घेऊन, सासवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, जनता हीच आमचे खरे दैवत असून, त्यांनी आम्हाला या पदापर्यंत पोहोचवले आहे, भाजपच्या मदतीने सासवडचा रखडलेला विकास हा फक्त जनतेच्या सेवेसाठी पदाचा माझा वापर केला जाईल, पाणी, आरोग्य, विविध सुविधावर विकासात्मक भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक माजी नगरसेवक सुहास लांडगे यांनी केले, सूत्रसंचालन माजी नगरसेवक यशवंत (काका) जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक विजय वढणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments