Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी पोलीस व पत्रकारांच्या कृतज्ञता सोहळा संपन्न; तर स्नेहल निगडे यांची पोलीस अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नुकत्याच झालेल्या पोलीस वर्धापन दिन व पत्रकार दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील पत्रकार बांधवांचा भेट वस्तू देऊन व नववर्षाच्या शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते वामन जगताप व मित्र परिवाराच्या वतीने या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, परमेश्वर गोडसे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. सासवड पोलीस ठाण्यामध्यील अधिकारी व कर्मचारी यांना थरमॅक्स बाटल्या व पत्रकारांना डायरी व पेन देऊन सन्मानित करण्यात आले. दैनंदिन कामकाज करत असताना पोलीस व पत्रकार यांना प्रेरणा देण्याचा, हा स्तुती उपक्रम असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनी सांगितले. प्रदीप जगताप व बाळासाहेब कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये नुकतीच एमपीएससी परीक्षेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून निवड झालेल्या गुळूंचे गावच्या स्नेहल राजेंद्र निगडे यांचा सत्कार करण्यात आला. निगडे यांनी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत, या पदाला माझ्या परीने न्याय देण्याचे काम होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमास शहरातील पोलीस कर्मचारी व पत्रकार दत्ता भोगळे,सुधीर गुरव, जीवन कड, गणेश मुळीक, बापू मुळीक, संभाजी महामुनी, राजेंद्र बर्गे, निलेश जगताप,अजिम आतार, सुनिता कसबे, छाया नानगुडे, वैभव जगताप, प्रिया पावशे, सीमा जगताप, अजिंक्य जगताप, सुरेंद्र इंगळे, खंडू जगताप, अतुल भोसले, गुप्त विभागाचे रुपेश भगत आदी उपस्थित होते. हेमंत ताकवलेे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments