Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये महिलांची कर्करोग तपासणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्त्रियांमध्ये वाढत्या कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटल पुण्याचा रोटरी क्लब ऑफ पुणे, हिल साईड रोटरी क्लब ऑफ पुरंदर आणि प्रयास संस्था यांच्या वतीने गर्भाशय मुख कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सासवड आणि व परिसरातील सुमारे 141 महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिराच्या सुरुवातीला महिलांना गंभीर आजाराची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणारा माहितीपटू दाखवण्यात आला. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे हिलसाईडचे अध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे, स्वाती म्हेत्रे, डॉक्टर सायली भालेराव, डॉक्टर संध्या खळदकर आणि डॉक्टर संजय रावळ यांनी मार्गदर्शन केले. चिंतामणी हॉस्पिटलचे डॉक्टर लक्ष्मण वांढेकर, डॉक्टर भास्कर आत्राम, डॉक्टर भालचंद्र दीक्षित आणि डॉक्टर विनायक बांदेकर यास रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष प्रमोद धनावडे आणि सदस्यांनी शिबिराचे नियोजन केले होते.

Post a Comment

0 Comments