राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट युती तर भाजप शिवसेना युतीच्या 'स्वबळावर 'चे गणित विस्कटलेले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात सध्या तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदरमध्ये तरी राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट युती झालेली आहे, शिवसेनेने शिंदे गट 'स्वबळावर' लढवण्याचे ठरवलेले आहे, तर भाजपने सुद्धा 'स्वबळावर' लढवण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे पुरंदर मध्ये युती राष्ट्रवादीची झाल्यामुळे बाकी पक्षांचे गणित पूर्णतः विस्कळीत झालेले दिसत आहे, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे वीर, बेलसर, गराडे, निरा -कोळविहीरे असे चार गट असून, पंचायत समितीचे वीर ,भिवडी, गराडे, दिवे, बेलसर, माळशिरस, निरा- शिवतक्रार व कोळविहीरे असे एकूण आठ गण आहेत, तालुक्यातील एकूण मतदार 1 लाख 89 हजार 403 असून, त्यात 95, 271 पुरुष 94,129 महिला व 3 इतर मतदार आहेत, 235 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 12 जागांसाठी मुलाखती प्रत्येक पक्षाच्या झालेल्या आहेत, भाजपकडून इच्छुक यांची संख्या 110 आहेत, तसेच शिवसेनेची सुद्धा इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे बंडखोरी रोखण्याचा मोठे आव्हान या दोन्ही पक्षासमोर उभे राहिलेले आहे, तर पुरंदर तालुक्यातील आत्तापर्यंतची राजकीय परिस्थिती अशी की, ज्याची युती होईल त्याचा हा सवबळावर लढणाऱ्या पक्षाला फटका हा बसत असतो, त्याचा परिणाम हे पुरंदर मध्ये सध्या तरी पाहायला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये मिळणार आहेत, राष्ट्रवादीच्या युती झाल्यामुळे भाजप शिवसेना शिंदे गट यांचे स्वबळाचे गणित विस्कटलेले आहे, त्यातच बेलसर माळशिरस या गटात- गणात देवदर्शन, ट्रिप, बैलगाडा शर्यत, विविध कार्यक्रमाची अक्षरशा: संभाव्य उमेदवारांनी एक प्रकारे मतदाराची चांगलीच उत्सुकता वाढवलेली आहे, परंतु काही उमेदवारांचे कार्यकर्ते, हे आदर्श आचारसंहितेच्या भंग करत आहेत, एका महिलेला दमदाठी शिवीगाळ प्रकार बेलसर माळशिरस गटात गणात घडलेला आहे, जर युतीने उमेदवाराला जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारी मिळाली, तर त्यात युतीला या गोष्टीचा परिणाम हा भोगावा लागेल, याची दक्षता ही युती घेताना दिसत नाही का?कार्यकर्त्यांची मनमानी, कारभार अरेरावीची भाषा, यामुळे युतीला फटका बसेल, याची योग्य वेळी जर नोंद घेतली नाही तर, बेलसर- माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात- गणात हा भाजप व शिवसेना शिंदे गटातच काटयाची टक्कर होणार आहे ,त्याचे परिणाम युती (राष्ट्रवादीला) सोसावे लागतील याची योग्य दखल अशी युती राष्ट्रवादीने घ्यावी अशी अनूभवी व्यक्तीने मत मांडले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments