पुरंदर तालुक्यातील जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये पूर्वाराणी जगताप ठरली "सभापती " सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड( ता. पुरंदर) येथील सासवड सांस्कृतिक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्यावतीने, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दि. 10 रोजी आयोजित 'कोण होणार सभापती' या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये सासवड( ता. पुरंदर )येथील पूर्वा राणी प्रवीण जगताप हिने स्पर्धा जिंकत 2026 चा सभापती होण्याचा मान मिळविला, नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, गटनेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, नगरसेविका स्मिता जगताप, अर्चना जगताप, अनिल उरवणे, एडवोकेट विजय भालेराव, संदीप इनामके, अनिल गद्रे, रवींद्र (पंत) जगताप, यांच्या हस्ते पूर्वा राणीला सभापती किताब चषक 7,000 हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक असे बक्षीस देण्यात आले, दरम्यान उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, दत्तात्रय गवळी, अनिल कदम, प्राचार्य उत्तम निगडे, विजय काकडे, शांताराम राणे, अनिल जगताप, हेमंत ताकवले, आदी उपस्थित होते. विजेत्या पूर्वाराणी हिने दुसऱ्या फेरीत 'मोबाईल व्यसन की गरज' या विषयावर विचार मांडून, सभापती करंडक पटकाविला, हा सन्मान तिने आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केला, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुभाष तळेकर, प्राध्यापक किशोरी ताकवले आणि प्राध्यापक संजय काटकर ,यांनी स्पर्धेचे परीक्षण केले, या स्पर्धेत 45 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, राजूरीच्या सागर चव्हाण यांनी 'ए आय योग्य की अयोग्य' विषयावर बोलत द्वितीय क्रमांकाचे 5,000 हजार रुपयाची रोख व स्मृतिचिन्ह पटकाविले 'पुस्तकाशी मैत्री' या विषयावर खर्च सुरज कुंभार यांनी बोलत तृतीय क्रमांकाचे 3,000 व स्मृतीचिन्ह पटकावले, संस्कारक्षम कुटुंब म्हणजे सक्षम समाज या विषयाचे सादरीकरण करीत योगेश कुंभारकर यांनी चतुर्थ क्रमांकाचे 2,000 हजार रुपयाचे रोख तर 'गावाचे गाव पण' या विषयावर बोलत शरद पाडसे यांनी विचार व्यक्त करीन उत्तेजनार्थ 1,000 हजाराचे बक्षीस व स्मृतीचिन्ह मिळवले, मंडळाचे सचिव रवींद्र (पंत) जगताप यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या सामाजिक सांस्कृतिक कामाची माहिती दिली.सदस्य प्रवीण पवार, अमित पवार, प्राध्यापक मनीषा कामठे, दिपक जगताप, जीवन कड, वर्षा खळदे यांनी संयोजन केले, प्राध्यापक स्नेहा शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप इनामके यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments