Hot Posts

6/recent/ticker-posts

“Operations’ Legacy : आरमार ते सिंदूर” – शौर्य, संस्कार आणि शिस्तीचा भव्य आविष्कार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “Operations’ Legacy : The Heritage, from ‘आरमार’ to ‘सिंदूर’ या देशभक्तीपर व प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित दि. ८, ९ व १० जानेवारी २०२६ या कालावधीत अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनास PSI अर्चना पाटील व PSI अशोक जाधव (सासवड , पोलीस स्टेशन ),कर्नल सतेश हंगे (उपसंचालक , सैनिक कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ,सातारा जिल्हा ),कर्नल सतिश रंदाळे (शौर्यचक्र, सेना मेडल, सेवानिवृत्त), राजेंद्र जगताप (IAS, सल्लागार – शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ), आनंदी(काकी) जगताप (अध्यक्षा – शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व नवनिर्वाचित नगराध्यक्षा, सासवड), नंदकुमार सागर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त), कुंडलिक मेमाणे ( माजी विस्तार अधिकारी ), विक्रम राजपूत (तहसीलदार ,सासवड), सोपान रणपिसे (नगरसेवक), स्मिता जगताप व अर्चना जगताप (नगरसेविका), सासवड नगरपरिषदेचे शहरसमन्वयक राम कारंडे, डॉ. मनोज बोराटे (प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालय), अजित साळवी, संदीप टिळेकर (प्राचार्य, गुरुकुल अकॅडमी), पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, स्काऊट-गाईड विभागाचे जिल्हा व विभागीय पदाधिकारी, माजी सैनिक संघटनेचे मान्यवर तसेच पत्रकार जीवन कड , बापू मुळीक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात “आरमार ते सिंदूर” या संकल्पनेतून भारतीय सैन्यदलांच्या ऐतिहासिक मोहिमा, शौर्य, त्याग, शिस्त व देशप्रेम विद्यार्थ्यांच्या नृत्य, नाट्य, समूहगीत व दृश्यात्मक सादरीकरणांद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आले . विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व भावनाप्रधान सादरीकरणांनी उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान आदर्श विद्यार्थी पुरस्कार, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल गौरव, उत्कृष्ट क्रीडापटू सन्मान तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट-गाईड कॅम्पमध्ये सहभागाबद्दल विशेष सन्मान प्रदान करण्यात आले. तसेच लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय स्काऊट-गाईड कॅम्पमध्ये महाराष्ट्राची लोकधारा सादर करत उत्कृष्ट दिग्दर्शन केल्याबद्दल विद्यालयाच्या शिक्षिका शीतल बोरुडे यांना विशेष पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले , ही बाब स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या रेणुका सिंह मर्चंट* यांनी केले. त्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, देशप्रेम व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये असे नमूद केले की पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आम्ही गेलो होतो परंतु अशी संस्कारात्मक थीम घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाचे पैलू पाडले जातात.ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. म्हणून ही शाळा पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट अशी शाळा आहे. तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या रेणुका सिंह मर्चंट, उपप्राचार्या सुषमा रासकर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख उज्वला जगताप, जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख स्वाती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता धसाडे, मनीषा लोखंडे, सुषमा वढणे, स्वाती भारती, हेमाली गोसावी, पुनम जाधव, शीतल बोरुडे, चित्ररेखा केसकर व कल्पना जगताप यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाचे आभार सुनिता नवले, मनीषा कुंजीर व माधुरी लोळगे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments