Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला 15 दिवसाची मुदतवाढ; 15 फेब्रुवारीपर्यंत त्या घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; तर राज्य निवडणूक आयोगासह निवडणुकीची तयारी केलेल्या, इच्छुकांनाही मिळाला दिलासा बापू मुळीक: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारीअखेर कसले परिस्थितीमध्ये घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, तसेच त्याला मुदतवाढ देणार नसल्याचेही स्पष्ट केले होते, पण आरक्षणाच्या तिढ्यामुळे त्यांना या निवडणुकीसाठी 15 दिवसाची मुदत वाढ आज द्यावी लागली असून, राहिलेल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीच्या निवडणुका 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यास त्यांनी सांगितले, अजून त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला ,तसा तो त्याची जोरदार तयारी केलेल्या इच्छुकांनाही, कारण ही निवडणूक आणखी पुढे गेली असती, तर त्याची तयारी वाया गेली असती, या दरम्यान राज्यातील 32 पैकी 20 जिल्हा परिषद आणि 351 पैकी अनेक तालुका पंचायतीमध्ये 50% पेक्षा जास्त झालेल्या आरक्षणाचा घोळ आता आयोगाला प्रथम मिटवावा लागणार आहे, नगरपरिषद व नगरपालिका नंतर राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरलेल्या कार्यक्रमांनुसार, दुसऱ्या टप्प्यात होणार होत्या, पण तेथे अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास, गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आले, त्यामुळे तेथील निवडणुका शेवटी गेल्या, तर हा घोळ कमी असलेल्या महापालिकांच्या अगोदर आल्या, तेथे येत्या १५ तारखेला मतदान आहे, दरम्यान महापालिका निवडणुकीची प्रक्रिया ही सुरू झाल्याने, जिल्हा परिषदातील ज्यादा आरक्षणाचा घोळ हा काही लगेच, आयोगाला मिटवता आला नाही, परिणामी 31 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत त्यांना ही निवडणूक घेणे शक्यच नव्हते, त्यामुळे त्याला दहा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती, दरम्यान ही निवडणूक जाहीर न झाल्याने, ते पुढे जाणार असल्याचे, संकेत मिळाले होते, पण ते सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून होते, स्थानिकांच्या या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुदतवाढ देण्याची राज्य निवडणूक आयोगाची मागणी, त्यांची नेमकी अडचण लक्षात घेऊन, सर्वोच्च न्यायालयात आज मान्य केली, त्यामुळे आता जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, महापालिका निवडणूकीचा बार उडताच, 16 तारखेनंतर ती घोषित होईल असा अंदाज आहे, दुसरीकडे मिनी आमदारकीची ही निवडणूक जास्त नाही, तर फक्त 15 दिवसांनीच पुढे गेल्याने, तिची जोरदार तयारी केलेला नाही, मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्याची आतापर्यंतची तयारी वाया जाणार नसून, उलट त्यासाठी आता आणखी काही दिवस मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments