Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील बस स्थानके लख्ख चमकणार; तर महिन्यातून दोनदा सासवड बसस्थानक स्वच्छ होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एसटी आता दर पंधरा दिवसांनी एसटी बस स्थानकाच्या संपूर्ण आवारामध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये, स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थिनी, नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळणार आहे, एसटीची सकारात्मक प्रतिमा, अधिक बळकट व्हावी, ही या उपक्रमाचा महत्वपूर्ण उद्देश आहे, प्लॅटफॉर्म इमारती कार्यालय ही स्वच्छ होणार, या मोहिमे अंतर्गत बस स्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालय, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष, आदींची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे, त्यामुळे स्थानक परिसरात अस्वच्छता काही प्रमाणात दूर होणार आहे, जाहिरातीच्या बॅनरची गर्दी हटवली जाणार बस स्थानकात साचलेला कचरा, अनावश्यक झाडी, झुडपे जाहिरातीचे फलक, जाळी जमटे यांचे निर्मूलन करून, परिसर अधिक स्वच्छ सुंदर व नीटनेटका केला जाणार आहे, कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून, कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे, शाळा कॉलेजातील मुलासह संस्थांची मदत या अभियानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिक संस्था, विद्यार्थी नागरिक तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, अंमलबजावणीची जबाबदारी विभाग प्रमुखावर प्रत्येक बस स्थानकावर या मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर सोपवली आहे, दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे, बस स्थानके स्वच्छ राहतील, सध्या आठवड्यातून दोन वेळा बस स्थानक धुऊन काढले जातात, शिवाय दररोज झाडलोट केली जाते, यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमले आहेत, स्वच्छता मोहिमेत सामाजिक संस्था, शालेय मुलांना समावेश करून घेणार आहे. सागर गाडे वरिष्ठ आगार प्रमुख सासवड एसटी महामंडळ.

Post a Comment

0 Comments