Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात केबल चोरांचा अक्षरशा: धुमाकूळ तर शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून पाण्याअधावी पिके संकटात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यामधील चोरट्याने सध्या तरी विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल चोरून नेऊन सत्र हे सध्या तरी सतत पुढे चालू राहिलेले असून, रब्बी हंगामात ऐन जोमामध्ये पीक आले असताना, केबल मधील तांब्याच्या तारा, चोरीला जात असल्याचे, शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याकारणाने, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, सध्या तरी पुरंदर तालुक्यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, आणि कांदा ही पिके अंतिम टप्प्यामध्ये, असून या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज आहे, एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे बिबट्याची दहशत, असतानाही शेतकरी रात्री अप रात्री पिकांना पाणी देत असून, मात्र चोरट्यांनी या परिस्थितीचा फायदा घेत, नवीन फंडा शोधलेला आहे, ते रात्रीच्या अंधारात विहिरीवरील केबल कापून, त्यातील तांब्याच्या तारा काढून, घेतात आणि प्लास्टिकचे आवरण तिथेच टाकून, प्रसार होत आहेत, वनपुरी गावामधील मागील आठवड्यामध्ये एकाच रात्री मध्ये दहा ते बारा शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या असून, आंबोडी आणि सुपेखुर्द परिसरातही हा प्रकार घडलेला आहे, सामाईक विहिरीवर अनेक विद्युत पंप असल्याने, चोरट्यांना एकाच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तांब्याच्या तारा मिळवणे सोपे जात आहे, नुकसान सोसून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा नवीन केबल बसवाव्या लागत आहेत, या टोळीचा पोलीस प्रशासनाने व तातडीने छडा लावावा, अशी मागणी वनपुरी चे माजी सरपंच रामदास कुंभारकर आणि इतर शेतकऱ्यांनी ही मागणी केलेली आहे, परिसरातील रात्री किंवा दिवसा कोणीही संशयास्पद व्यक्ति किंवा वाहने फिरवताना, दिसल्यास खात्री करावी, ज्या शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत, त्यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार द्यावी. जेणेकरून आम्हाला तपास करणे सोपे होईल. कुमार कदम पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.

Post a Comment

0 Comments