पुरंदर तालुक्यातील पक्षांतरामुळे समीकरण बदलणार; चौरंगी लढतीचे चित्र, उमेदवार यांची मोर्चे बांधणी, मतदारांशी थेट संपर्क; शक्ती प्रदर्शनाला प्रचंड वेग तर आजी-माजी आमदारांचा लागणार कस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या चार वर्षाच्या अधिकच्या कालावधीनंतर, होत असल्याने, पुरंदर तालुक्यात वातावरण चांगलेच तापू लागले आहे, पुरंदर तालुक्यात सध्या तरी बदललेले पक्षीय समीकरण पाहता, यावर्षी तरी यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असून, पुरंदर मध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे, चित्र दिसून येत आहे, निवडणुकीची तयारी झाल्याने, इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी, मतदारांशी संपर्क, तर शक्ती प्रदर्शनासाठी प्रचंड वेग आला असून, देवदर्शन, बैलगाडा शर्यती, होम मिनिस्टर कार्यक्रम, क्रीडा व कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे, पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत, सन 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार व राज्यमंत्री असल्याचा, फायदा हा शिवसेनेला झाला होता, त्यामुळे प्रथमच पुरंदर पंचायत समितीवर भगवा हा फडकवलेला होता, आताही शिवतारे हे आमदार आहेत, शिवसेनेतील फुटीचा पुरंदर मध्ये फारसा परिणाम हा झाला नसून, बहुतांश महत्त्वाचे असे की, कार्यकर्ते, सदस्य हे शिवसेनेतच आहेत, माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यात भाजपची ताकद लक्षणीय रित्या वाढलेली आहे, त्यांच्यासोबत माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष बाबाराजे जाधवराव, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे हे सक्रिय असल्याने, ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिवसेनेसाठी सोपी राहिलेली नाही, सासवड नगरपालिकेवर भाजपने विजय मिळवल्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर जेजुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा अजित पवार गटाने विजय मिळवल्यामुळे हा गट सुद्धा आनंदी वातावरणामध्ये आहेच, त्यातच विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे, स्पष्ट झाले असून, मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची भूमिका अजूनही गुपित असून, त्यांच्याकडूनही उमेदवारांची अजून चाचणी सुरू आहे, या परिस्थितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या योग्य वेळी युती करायची की, नाही ते ठरणार आहे, काँग्रेस, उद्धवसेना, मनसे, आम आदमी पक्ष, अपक्ष उमेदवार हेसुद्धा रिंगणात उतरण्याची शक्यता असली, तरी त्यांच्या ताकतीमुळे तर निवडणुकीत फार मोठी अशी चुरस निर्माण होण्याची शक्यता ही कमी मानली जाते आहे, बेलसर, माळशिरस: सर्वसाधारण: हा मतदारसंघ खुला असल्याने, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हे पुन्हा निवडणूक लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते, माऊली यादव भाजपचे यांनी तर प्रचार सुरू केलेला आहे, या व्यतिरिक्त अमोल कामठे, बाळासो कामठे, रमेश इंगळे, कैलास कामठे, बाळासो कोलते, माणिक निंबाळकर. दिवे, गराडे: सर्वसाधारण: श्री विद्यमान सदस्या ज्योती झेंडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांची कन्या उदयानी जाधवराव, माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांची कन्या दिव्या जगदाळे, तसेच आमदार बापू पठारे यांची कन्या रूपाली अमोल झेंडे- पठारे, गौरी कुंजीर, संगीता काळे, वृषाली, काळे, गीतांजली ढोणे, प्रतिभा कदम. वीर, भिवडी: सर्वसाधारण: तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे, तानाजी उर्फ पिनू काकडे, शैलेश तांदळे, समीर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहुरकर, पुष्कराज जाधव, राहुल गायकवाड, भूषण ताकवले यामधील शिवसेना शिंदे गटाचा हा बालेकिल्ला येत्या काळामध्ये उमेदवार निश्चिती व युती आघाड्यामुळे राजकारण हे अधिक तापणार आहे, असे चिन्ह दिसून येत आहे. निरा- शिव तक्रार, कोळविहीरे: नागरिकांचा मागास प्रवर्ग :या गटातून माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सून सानिका टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांची कन्या डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, तेजश्री काकडे, सुजाता दगडे, सम्राज्ञी लंबाते हा गट परंपरेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु येथे मागील निवडणुकीत शिवसेनेने येथे वर्चस्व प्रस्थापित केले होते, आता सध्या तरी निरेतील चव्हाण कुटुंबाकडून चाचपणी सुरू आहे. यामुळेच पुरंदर प्रामुख्याने चौरंगी लढतीचे चित्र दिसून येत आहे,पुरंदरच्या पक्षांतरामुळे समीकरणे बदलणार असून, आजी-माजी आमदारांचा चांगलाच कस लागणार आहे, त्यात अजित पवार गटाचे सुद्धा पुरंदर तालुक्यात वर्चस्व चांगले आहे, जर अजित पवार गटाची व शरद पवार गटाची युती झाली तर, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या उत्सुकतेची पाहायला मिळणार आहेत ,यात कोण बाजी मारतोय हे पहावे लागणार आहे, परंतु सध्या तरी निवडणुकीची रंगत चांगलीच तापत चाललेली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments