Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात; तर आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे: निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुरंदर तालुक्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुरंदर तालुक्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, आज 16 जानेवारी 2026 पासून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, नामनिर्देशन पत्रे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार परिषदेच्या ठिकाणी ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम राजपूत, पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, निवासी नायब तहसिलदार संदीप पाटील,निवडणूक नायब तहसिलदार गौजारे (घाटे)शुभांगी,सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण आदी उपस्थित होते. लांडगे पुढे म्हणाल्या की, पुरंदर तालुक्यात पंचायत समितीच्या आठ आणि जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली असून, त्यानुसार तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे, या निवडणुका शांततेत पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पाडाव्यात ,यासाठी सर्व संबंधितांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज सासवड तहसील कार्यालयातून वितरित केले जाणार आहेत, एकूण चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येईल, निवडणूक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाची संयुक्त बैठक आयोजित केली होती, एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येईल, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे उमेदवारांना नामनिर्देश पत्रे दाखल प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, जाहीर सभा, प्रचार कालावधी, विविध परवानगी प्रतिनिधी, नेमणूक तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने, प्रशासन आणि राजकीय पक्षासोबत प्रतिनिधीची बैठक घेऊन, योग्य त्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 कार्यक्रम नामनिर्देशन पत्र: स्वीकारण्याचा कालावधी 16 ते 21 जानेवारी 2026, नामनिर्देशनाची छाननी 22 जानेवारी 2026, उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026, निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026, अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026, मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 आणि मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 असा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments