Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील नगरसेवकाकडूनच अतिक्रमण तर जेजुरी येथील पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांचा आरोप सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकाकडूनच विकास कामावर लक्ष देण्याऐवजी, शासनाच्या जागेवर अतिक्रमणे करण्याचे काम केले जात असल्याचा, आरोप माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. नगरपालिका निवडणूक होऊन एक महिना झाला नाही, तर शहराच्या विकासाची नवीन कामे नवनिर्वाचित नगरसेवकाकडूनच अपेक्षित आहेत, नवनिर्वाचित नगराध्यक्ष भ्रष्टाचार मुक्त कामे होतील, असा वारंवार संदेश देत असल्याचा नमूद केले आहेत, मात्र काही नगरसेवक सहकारी जागेत अतिक्रमणे करीत असल्याचे, हेमंत सोनवणे यांनी सांगितले. याबाबत एका नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही याबाबत तक्रार करणार आहेत, त्याबाबत प्रशासनाने तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हेमंत सोनवणे यांनी यावेळी केली आहे.

Post a Comment

0 Comments