Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी रंगणार जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील सांस्कृतिक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या वतीने, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कोण होणार सभापती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा होणार आहेत, स्पर्धेचे यंदाचे हे आठवे वर्ष असून, खुल्या गटासाठी होत असलेल्या, या स्पर्धेत पुरंदर हवेलीतील 18 वर्षा पुढील महाविद्यालयीन युवक, युवती तसेच, सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार, आहे ना, मात्र प्रवेश फी आहे 9 जानेवारीपर्यंत, प्रवेश अर्ज भरून देणे, बंधनकारक आहे, 10 जानेवारीला सासवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सेंटर ऑफ एक्सलेंस येथे सकाळी दहा वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव रविंद्र जगताप यांनी दिली. शनिवारी दि. 10 रोजी सकाळी 10 वाजता माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आणि सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन तर याच दिवशी सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे ,या स्पर्धेसाठी दोन फेऱ्या असून, पहिल्या फेरीसाठी5 + 2 मिनिटांचा अवधी आहे, यासाठी वंदे मातरम, राजकारणातील अर्थकारण, आधुनिक काळातील किल्ल्यांचे महत्त्व, श्री कुटुंब संस्कार आणि ट्रॅप ब्रह्माचर्य हे विषय आहेत, दुसऱ्या फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात येऊन, त्यांना चिठ्ठी प्रमाणे ऐनवेळी विषयावर बोलावे लागणार आहे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स सासवड येथे तसेच 9763723702 आणि 9423024448 या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे, बक्षिसाचे स्वरूप प्रथम क्रमांकाला सभापती किताब प्रशस्तीपत्र आणि रोख 7,000 चे बक्षीस, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार आणि 1,000 रोख तसेच ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments