पुरंदर तालुक्यातील शिवाजी विद्यामंदिर आंबळे शाळे अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धामध्ये प्रथम आनम नाजिम शेख, द्वितीय वरद प्रदीप दरेकर, तृतीय धनश्री शेबडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य शाखा सोपानगर सासवड यांच्या वतीने, श्री शिवाजी विद्यामंदिर आबळे शाळेंतर्गत घेण्यात आलेल्या, निबंध स्पर्धा मध्ये शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये आनंद नाजिम शेख , वरद प्रदीप दरेकर, धनश्री शेंबडे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला असून, सनी कुंजीर, सई दरेकर यांना उत्तेजनारार्थ पारितोषिक मिळाले, सदर विद्यार्थ्यांना प्रवीण जगताप व परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन, गौरविण्यात आले, तसेच सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन, गौरविण्यात आले ,सदर कार्यक्रमास साहित्य परिषदेचे पदाधिकारी डॉ. कोडीतकर , सिद्राम भुजबळ, शिरवळकर सर, जगदीश पांढरे, प्रशालेचे मुख्याध्यापक बधे सर, शिक्षक, शिक्षकेतकर कर्मचारी, आंबळे गावचे उपसरपंच अजित जगताप, ग्रामस्थ प्रदीप खंडू जगताप, ज्ञानेश्वर नितीन( काका) दरेकर, नंदकुमार दरेकर, राजेंद्र (अण्णा )दरेकर, किशोर दरेकर, शशिकांत( भाऊ) दरेकर, प्रमोद दरेकर, दिलीप दरेकर, गुलाब (आप्पा )जगताप, रामचंद्र बधे आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments