Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाट रस्ता आज पासून सात दिवस बंद राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजेच बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवार दि. 8 ते बुधवार दि. 14 रोजी या कालावधीमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने (प्रशासनाने) निर्णय घेतलेला आहे. बोपदेव घाटामध्ये सध्या रस्त्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याची निश्चित केले आहे ,विशेष म्हणजे या कालावधीमध्ये एकेरी वाहतूकही सुरू राहणार नाही, त्यामुळे वाहन चालकांना या मार्गाकडे न वळवण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे, बोपदेव घाट बंद असल्यामुळे, प्रवाशांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिवहेेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग हवेली दोनचे शाखा अभियंता देवेन मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments