Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेमध्ये ढोकराई फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता २ ची विद्यार्थिनी कु.काव्या कैलास ढवळे हिने संत गाडगे महाराज यांचे वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकणारे विचार व्यक्त करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. हिला शिक्षका साबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल काव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे केंद्रप्रमुख भुकन सर, मुख्याध्यापक संगीता लगड यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments