Hot Posts

6/recent/ticker-posts

नायगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत चौंडकर यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धेश्वर नायगाव येथील नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या संस्थेची अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.यावेळी सोसायटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले,नायगावचे माजी उपसरपंच,पत्रकारिता व इतर अनेक क्षेत्रात काम करणारे चंद्रकांत चौंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागवान यांनी काम पाहिले.त्यांना सचिव मंगेश शेंडगे यांनी सहकार्य केले.चंद्रकांत चौंडकर यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे,मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे,सासवड नगर पालिकेच्या नगरध्यक्षा आनंदी (काकी)जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय कोलते, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश इंगळे,सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण चोपडा,विश्वस्त बी. बी कड,डॉ दशरथ ठवाळ, अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ,पुरंदर तालुका संत सोपानकाका ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश भगत,पुरंदर नागरी पतसंस्थेचे संचालक बाबासो चौंडकर,सहायक निबंधक पुरंदर यशोमती मेश्राम,पुरंदर पब्लिसिटीचे अध्यक्ष गौरव कोलते,पिंपरी सोसायटीचे माजी अध्यक्ष दादा मारणे,राजुरीचे माजी उपसरपंच विपुल भगत,इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.कंपनीचे एच आर विभागाचे हेड निषाद सालम व इतर अधिकारी,,पुरंदर तालुका पत्रकार संघ,राजुरी,नायगाव,रिसेपिसेग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपाध्यक्ष प्रकाश कड,संचालक काशिनाथ खळदकर,विलास खेसे,संजय होले,रोहिदास कड,दिलीप फडतरे,संदिप खेसे,अर्जुन पाटोळे,रोहिदास शेंडगे,संदिप चौंडकर,मनीषा मेमाणे,पुष्पा चौँडकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक,आजी माजी पदाधिकारी,तरुण,ग्रामस्थ, महिला,इतर सोसायटीचे सचिव, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments