पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील सासवड नगरपरिषदेचे येथील दिव्यांग यांची कोणतीही माहिती सासवड नगर परिषदेच्या अधिकारी वर्गाने श्रीमती सुरेखा ढवळे यांना देऊ नये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या येथील दिव्यांग यांची कोणती माहिती श्रीमती सुरेखा ढवळे यांना नगराध्यक्ष व मुख्याधिकारी प्रशासन विभागाने देऊ नये, अशा संदर्भातील सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप व मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना प्रहार अपंग क्रांती संघटनेने निवेदन दिलेले आहे, कारण की, श्रीमती सुरेखा ढवळे यांची सन 2021 मध्ये प्रहार अपंग संघटना मधून हकालपट्टी ही करण्यात आलेली आहे, तसेच प्रहार अपंग क्रांती संघटनेचा गैरवापर करत असून, सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धमक्या देत आहे ,सासवड शहरातील गोरगरीब अपंगानीच्या हक्काचा पाच टक्के निधी मिळवून ,देण्याच्या नावाखाली दिव्यांकडून पैसे लुबाडत आहे, सध्याच्या स्थितीमध्ये सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी (काकी )जगताप या माझ्या आई आहेत, या नावाखाली सर्वत्र सासवड शहरात, पुरंदर तालुक्यात सांगत, फिरत बाजू आपली मांडण्याचा जो केविलवाना तो प्रकार त्यांचा चालू आहे ना? त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने काशिनाथ जगताप पुरंदर तालुका संपर्कप्रमुख, दत्ता दगडे सासवड शहर अध्यक्ष, हनुमंत नेटके पुरंदर तालुका विभाग प्रमुख, छाया सकट महिला अध्यक्ष पुरंदर, इरमान इनामदार सचिव पुरंदर तालुका,संदीप जगताप, रवींद्र गिरमे, योगीराज जगताप, विजय जगताप, नंदकुमार गीते, चंद्रकांत कसबे, बनसोडे, वसंत दिवसे, गणेश गुरव, आदींनी मागणी निवेदनाद्वारे सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना केली आहे. नवीन माहिती अशी की, आता दोन ते तीन दिवसापूर्वीच सासवड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना घाणेरड्या वर्तणूकीतून, ढवळे यांच्या त्रासाला कंटाळून, वैतागून गेलेले असल्यामुळे, या सर्वांनी कोणतीही माहिती ढवळे यांना माहिती देऊ नये ,यासाठी सुरेखा ढवळे यांनी दिव्यांगांची माहिती जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्या संदर्भात जर नगर परिषदेने काही कारवाई केली नाही, तर काशिनाथ जगताप, हनुमंत नेटके यांनी त्या संदर्भातील बाबीवर ठणकावून सांगितले आहे की, पुढची दिशा आम्ही ठरवू, काय करायचे ते, काय नाही, ते स्पष्टच इशारा प्रहार अपंग संघटना पुरंदर यांनी दिलेला आहे, अशी सविस्तर माहिती काशिनाथ जगताप यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments