पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याचा आरोप करत पुरंदर हवेली भाजपच्या वतीने सोमवारी दि. 16 रोजी सासवड तालुका पुरंदर येथील शिवतीर्थावर भव्य अशी निदर्शने करण्यात आली, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, वंदन केले आणि सपकाळ यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला, स्वराज्याचे संस्थापक शिवरायांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असे वक्तव्य करणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असा सूर यावेळी उमटला. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, शैलेश तांदळे, शहराध्यक्ष आनंद जगताप, संभाजी काळाणे, मंडळ अध्यक्ष संजय निगडे, संदीप कटके, साकेत जगताप, नव्वनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोंले आणि अजय इंगळे तसेच शैलेंद्र ठाकूर, विठ्ठल मोकाशी, चंद्रकांत बोरकर, तुषार ढुमे,सागर जगताप, तुषार जगताप आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments