पुरंदर तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीवर दहा प्रशासकांची नियुक्ती तर अधिकारी निहाय गावांची जबाबदारी निश्चित सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार पुरंदर तालुक्या अंतर्गत 67 ग्रामपंचायतीवर 10 प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली असून, संबंधित ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपुष्टात आल्याने ,पुढील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी प्रशासकीय कारभार अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे, जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारी निहाय गावांची जबाबदारी निश्चित केली असून, प्रत्येक अधिकाऱ्याकडे ठराविक ग्रामपंचायतीचा कारभार सोपविण्यात आला आहे, त्यानुसार पुरंदर समितीचे पंचायत विस्तार अधिकारी बबनराव चखाले यांच्याकडे साकुर्डे ,दौंडज, कोळ विहिरे, केतकावळे, सुपे खुर्द ,पिंपळे, भिवडी ,पूरपोखर, देवडी अशी नऊ गावे देण्यात आली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एच.डी. कांबळे यांच्याकडे कुंभारवळण, दिवे, सोनोरी ,झेंडेवाडी, जेऊर ,परिंचे,वाघापूर, गुरोळी अशी आठ गावे सोपवण्यात आली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र गिरमे यांच्याकडे चाबळी, हिवरे, मांडकी, गराडे, भिवरी, बोपगाव अशी सहा गावे देण्यात आली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एस. एस. नेवसे यांच्याकडे तक्रारवाडी, वाळूज, ढालेवाडी, खळद, निलुज, बेलसर, शिवरी, पोंढे, आंबले अशी नऊ गावे देण्यात आली आहेत ,पुरंदर पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.व्ही. ढवळे यांच्याकडे टेकवडी, राजेवाडी, हरणी अशी तीन गावे दिलेली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एन, के, थापटे यांच्याकडे पिंपरी, नायगाव ,रिसे, पिसे, पारगाव ,पिसर्वे, मावडी सुपे, बोराळवाडी अशी आठ गावी देण्यात आलेली आहेत ,पुरंदर पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी बी.डी काकडे यांच्याकडे पानवडी, काळदरी, मांढर, माहूर, हरगुडे, तोंडलवाडी, सटलवाडी अशी आठ गावी देण्यात आलेली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी ए. आर .जेधे यांच्याकडे आंबोडी, कोडीत बुद्रुक, कोडीत खुर्द, असकरवाडी, थापेवाडी, सोमरडी, खानवडी अशी सात गावी देण्यात आलेली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी एस.बी. ताठे यांच्याकडे नाझरे सुपे, नाझरे कडे पठार, पिंपळे खुर्द ,पिसुरटी, तक्रारवाडी अशी पाच गावे देण्यात आलेली आहेत, पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जी.एच. लाखे यांच्याकडे जवळाअर्जुन, पांडेश्वर, राख, मावडी कडे पठार अशी चार गावे सोपविण्यात आलेली आहेत, अशा प्रकारे एकूण 67 ग्रामपंचायतीचा कारभार आता दहा प्रशासकीय अधिकारी चालवणार असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हेच अधिकारी विकास कामे, निधी वापर शासकीय योजना व दैनंदिन प्रशासन पाहणार आहेत अशी माहिती गटविकासअधिकारीपुरंदर प्रणोती श्रीश्री माळ यांनी ही सर्व माहीती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments