पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमित झेंडे सभापती पदासाठी उमेदवार दावेदार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारल्याने, आठ पैकी चार जागा जिंकल्या असून, भाजप व शिवसेना शिंदे गट यांना प्रत्येकी दोन जागावर समाधान मानावे लागले, त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने ,तरी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीचा सभापती होणार असल्याचे मानले जात आहेत, तरी राष्ट्रवादीशी कोण युती करणार, तर युतीनंतर सहभागी ठरणाऱ्या पक्षाला उपसभापती पद कोणाला देणार का? याबाबत उत्सुकता पुरंदर मध्ये निर्माण झालेली आहे, राज्यात ज्या पद्धतीने महायुती असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी व भाजप असेच चित्र पाहायला मिळाले, निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचे विजय शिवतारे व माजी सभापती अतुल मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्यावर केलेली टोकाची टीका ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चांगलीच टोचली असून, दुसरीकडे अजित दादा पवार यांच्या निधनांमुळे राष्ट्रवादी व भाजपने शांततापूर्वक प्रचार केला होता, त्याच पद्धतीने निरा बाजार समिती व सोमेश्वर कारखान्यात हे दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी व भाजप एकत्र सत्तेत असल्याने, त्याबरोबरच जिल्हा बँकेचे संचालक संजय जगताप व प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांचे ऋणानुबंध सबंध पाहता, राष्ट्रवादी व भाजप एकत्र येऊन, सत्ता स्थापन करतील असा विश्वास आहे, यामध्ये दिवे गराडे कोळविहीरे निरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माळशिरस भिवडी मध्ये भाजप तर बेलसर व वीर मधील शिवसेना शिंदे गट पक्ष यांचे शिलेदारा म्हणून निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादी व भाजप जर युती झाल्यास, उपसभापती पद भाजपला मिळेल अशी परिस्थितीत माळशिरस गणातून निवडून आलेले भाजपचे माऊली यादव व भिवडी गणातून निवडून आलेल्या सायली शिंदे या गणातून निवडून आलेल्या आहेत, भिवडी गावच्या अनेक वर्ष असे दिग्गज यांनी आतापर्यंत सभापती पदाची धुरा सांभाळलेली आहेत, तर माऊली यादव हे माळशिरसचे माजी उपसरपंच असून, सध्या तरी त्यांच्या पत्नी ह्या माळशिरस गावच्या थेट जनतेतून, सरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत, राष्ट्रवादी शिवसेना युती पुरंदर मध्ये होणे व निश्चित असून, पुरंदरच्या आमदाराची निरा कृषी उत्पन्न बाजार समिती व सोमेश्वर कारखान्याला विद्यमान आमदारांची काही मदत मिळणार नाही ,याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी भाजपचीच चाचपणी करत आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला पुरंदरमध्ये बाजूला सरकावले जाते ,असे यावेळी चित्र पाहायला मिळत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी व भाजप युती होणार असल्याचे, जेष्ठ पदाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे, अशी सर्व माहिती राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांनी सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments