Hot Posts

6/recent/ticker-posts

नारायणपूर येथे महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांचा भव्य जंगी आखाडा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नारायणपूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक कुस्त्यांचा भव्य व जंगी आखाडा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. गावातील नागरिकांसह परिसरातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आखाड्याचा आनंद लुटला. या आखाड्यासाठी पुरंदर व हवेली तालुक्यातील नामवंत व बलाढ्य पैलवानांनी आपली ताकद, कौशल्य आणि जिद्द दाखवत उपस्थिती लावली.परंपरेनुसार कुस्त्यांची लावणी ₹१,००० पासून थेट ₹५१,००० रुपयांपर्यंत करण्यात आली होती. प्रत्येक कुस्तीमध्ये प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महिला शौकीन कुस्तीगीरांनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कुस्ती क्षेत्रातील आपली वेगळी ओळख निर्माण केली.या कार्यक्रमाला नारायणपूरचे सरपंच प्रदीप (बापू) बोरकर, भिवडी गावचे उद्योजक तात्यासो भिंताडे, माजी सरपंच भरत( नाना) क्षीरसागर, सवाई उद्योग समूहाचे मालक उत्तमराव गोळे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान तात्यासो बोरकर, पैलवान गुलाब गायकवाड, माजी सरपंच चंद्रकांत बोरकर, रामभाऊ बोरकर, दिलीप भिताडे,संदीप बोरकर, अभिजित बोरकर, पोपट गोळे, अजित न्हालवे , उद्योजक सदानंद बोरकर आणि योगेश तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत (नाना) क्षीरसागर यांनी अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण व रसपूर्ण शैलीत केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार योगेश तावडे यांनी मानले. कुस्ती पंच म्हणून बाबासो झेंडे आणि सदानंद बोरकर यांनी निःपक्षपाती व काटेकोर निर्णय देत आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.हा कुस्ती आखाडा केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, परंपरा जपणारा, नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि सामाजिक ऐक्य व एकोप्याचे दर्शन घडवणारा एक भव्य उत्सव ठरला.

Post a Comment

0 Comments