Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड फार्मसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची राज्यसेवेत उल्लेखनीय कामगिरी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवडच्या 2012 च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. पूजा राजन मालवणकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा सहायक आयुक्त (औषधे), महाराष्ट्र राज्य या पदासाठी निवड झाली आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम निकाल जाहीर झाला.कु. मालवणकर यांचे बालवाडी पासून फार्मसी पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण सासवड येथेच झाले आहे. बालवाडी ते चौथी शिक्षण बालविकास मंदिर येथे, पाचवी ते दहावी वाघीरे विद्यालयात, अकरावी-बारावी पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे पूर्ण करून त्यांनी सासवडमधील फार्मसी कॉलेज येथून 2012 साली फार्मसी पदवी संपादन केली.त्या सध्या अन्न व औषधे प्रशासन, महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत आहेत. 2016 साली अन्न व औषधे प्रशासनची परीक्षा देऊन 2017 मध्ये त्या महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवडल्या गेल्या. प्रारंभी मुंबई येथील प्रयोगशाळेत सेवा बजावल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रयोगशाळेत झाली.नोकरी व घरची जबाबदारी सांभाळत स्वअभ्यासाच्या बळावर त्यांनी सहायक आयुक्त (औषधे) पदासाठी यश मिळवले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने त्यांच्या या भव्य यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे सासवड शहर व महाविद्यालय परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments