पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीसाचा बुलेट युवकांना दणका बेशिस्त असणाऱ्या वाहन चालक पोलिसांच्या रडारवर तर अल्पवयीन मुलांच्या पालकावर सुद्धा गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाहतुकीच्या नियमाची 'ऐशी तैशी अशी धूम स्टाईल 'करत असणाऱ्या बेशिस्त वाहन चालकामुळे नागरिकांमध्ये एक त्रस्थ प्रकारची वातावरण निर्माण झालेली आहे, त्यातच आता सायलेन्सर काढून, कर्कश आवाजामध्ये धुडगूस घालणारे यांची त्यामध्ये भरपूर प्रमाणात भर पडलेली आहे, सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत दोन बुलेट जप्त केल्या आहेत, बुलेट चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय परिसरामध्ये फिरणाऱ्या टुकार व रोड रोमिवांच्यासाठी कोचिंग क्लासेस परिसरामध्ये सतत त्रास देणाऱ्या टुकार आणि रोडरोमयावर कारवाई करण्यासाठी वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या, परंतु टुकार मुले मोटार सायकलचा कर्कस आवाज करत, महिलांना विद्यार्थिनींना त्रास देऊन सर्वांचे लक्ष विचलित करत होते, हॉर्न वाजवणारे शाळा आवारात ट्रिपल सीट फिरून मधून गिरीकी करून मुलींना त्रास देणारे टवाळ खोर बुलेट गाडींचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारे ताब्यात पोलिसांच्या घेतले असून, ग्रामीण पोलिसांनी त्यावर मोठी कारवाई केली होती, सोपानगर परिसरामध्ये एक प्रसूती गृह, शाळा, ज्येष्ठ नागरिक व सासवडकर नागरिकांसाठी फिरता येणारे पालखी तळ आहेत, त्यामुळे त्या परिसरामध्ये अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे, गुरुवारी सोपाननगर येथील सामाजिक कार्यकर्त्या निता सुभागडे यांनी काही रहिवाशांच्या मदतीने तीन गाड्या पकडून पोलिसांना कळवले होते, परंतु अपेक्षित अशी कारवाई झालेली नव्हती, सध्या बेफान वाहनांची संख्या वाढलेली असून, पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी ही समाजातून होत आहे, बुलेट अथवा इतर वाहनांच्या हॉर्नमध्ये बदल केल्यास थेट गुन्हा दाखल करण्यास इशारा पोलिसांनी दिलेला आहे, दोन बुलेट जप्त केल्या असून, एका अल्पवयीन मुलाच्या पालकावर सुद्धा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम सासवड पोलीस स्टेशन यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली. आज पासून धडक मोहीम बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी एक पथक स्थापन केले असून, सोमवारपासून धडक मोहीम हाती घेण्यामध्ये येणार आहे, विशेषत शाळा महाविद्यालय परिसरामध्ये ही कारवाई करण्यात येईल, आरटीओला देखील कळवले असून, कारवाई होईल असेही कदम यांनी सांगितले आहे. एक कोटीचा दंड वसूल ट्रिपल सीट दुचाकी प्रवासाला लगाम घालण्यासाठी सासवड पोलिसांनी गेल्या पाच दिवसापासून पोलिसांनी एक प्रकारचे व्यापक कारवाई करत तब्बल 5,380 वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली असून, 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या धडक कारवाई मध्ये एक कोटी, तीन लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी ही माहिती सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments