पुरातन चांगावटेश्वर मंदिरात हर हर महादेव चा जागर... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुरातन चांगावटेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने प्रथम प्रहरी रुद्र अभिषेक मंदिराचे कारभारी प्रसाद ऊर्फ पिंटू जगताप यांचे हस्ते सपत्नीक संपन्न झाला. यावेळी सभासद विशाल जंगम, चेतन एक्के, धैर्यशील देशमुख, अक्षय गोडसे, पौरोहित्य अक्षय बेलसरे गुरुजी यांनी केले. तद्नंतर सासवड मधील ग्रामस्थांनी अभिषेक केले व दर्शनासाठी गर्दी केली. लक्ष्मी नारायण मंदिर यांचे वतीने ह.भ.प. निलेश महाराज शिंदे यांनी हरीनाम सप्ताह आयोजन केले होते. समाप्ती सोमवारी भंडारा महाप्रसादाने होणार असल्याचे सुधार समिती तर्फे सांगण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments