Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर येथे महाशिवरात्री निमीत्त रांगेत उभे राहून, दिवसभरात दोन लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले .मंदिरावरती' हर हर महादेवचा जयघोषाने' परिसर दणाणून गेला . पहाटे तीन वाजता शिवलिंगा वरती दही ,दुध व पंचामृतने आंघोळ घालुन विधीवत पुजा करुन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली .शिवलिंगावरती पोशाख चढवण्यात आला .पाच वाजता पंचायत समिती सदस्य माऊली यादव व माळशिरस गावच्या सरपंच आरती यादव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.. सकाळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, प्राजक्ता दुर्गाडे,निरा मार्केट कमेटीच्या संचालीका शाहाजान रफीकभाई शेख, तर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, जालिंदर कामठे, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदीराभोवती दर्शन रांग लागली होती .आज भिमाशंकर देवस्थान बंद असल्याने, भुलेश्वर येथील भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ झाली . मंदिरासमोर माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने पहाटे भक्ती गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला .दुपारी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून मंदिराभोवती माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने सावलीसाठी मंडप टाकण्यात आला.दिवसभर थंडगार फिल्टरचे पाणी देण्यात आले .भुलेश्वर देवस्थानच्या वतीने दर्शनबारीची योग्य नियोजन करण्यात आले . वन उद्यानाच्या बाहेर वाहने आडवण्यात आल्याने , वाहन कोंडी झाली नाही . जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला.दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.माळशिरस प्राथमिकआरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली .विद्युत वितरण कंपनीने वीज सेवा सुरळीत दिली .राञी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने भजनाच्या भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र भुलेश्वर देवास मानाचा पोषाख करण्यात आला राञी बारा वाजता' हर हर महादेवच्या जयघोषात' महाशिवरात्री याञेची सांगता करण्यात आली . फोटो ओळ : श्री क्षेत्र भुलेश्वर येथे महाशिवरात्री निमीत्त केलेली आकर्षक पुजा

Post a Comment

0 Comments