पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र वीर येथे भाविक भक्तांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी: श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील श्रावणी दर्श पिठोरी अमावस्या निमित्त जिल्ह्यातून देखील भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज हे काशीकंट काळ भैरवनाथाचे अवतार असून, काळभैरव हे भगवान शिव शंकराचेच अवतार आहेत, त्यामुळे इतर अमावस्या् प्रमाणे श्रावणी अमावस्येला भाविक मोठ्या प्रमाणात कुटुंब दर्शनाला येत असतात, शुक्रवारी दुपारी ११:४५ वाजता अमावस्या सुरू होऊन, शनिवारी दि. 23 दुपारी 11:35 ला अमावस्या संपत आहे. काळभैरवनाथ हे शनि महाराजांचे आराध्य दैवत असून, शनि महाराज काळभैरवनाथाचे नामस्मरण करीत असत, अशी आख्यायिका असल्याने, शनी महाराजांच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी अनेक भक्ति भावकांच्या श्रीनाथाच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी करत असत आहेत, दुपारी अमावस्या सुरू झाली असली तरी, सकाळपासूनच भाविकांनी रांगेत दर्शन घेतले, सर्वत्र "सवाई सर्ज्याचं चांगभलं" चा जयघोष करीत गुलाल उधळण करीत, अनेक भाविकांनी श्रीनाथांना मनोकामना आपल्या मांडल्या आहेत. नेहमीप्रमाणे श्रावणी अमावस्याा निमित्त श्री शेत्र वीर येथील भाविकांनी देवांना दहिभाताच्या पूजा बांधून, अभिषेक करण्यात आले. परंपरेप्रमाणे मंदिराच्या रितीरिवाजाप्रमाणे भाविक धूप आरती करून, दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले, मंदिरातील दगडी कासवावर, दिवसभर सालकरी गोसावी मंडळाचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. भाविकांसाठी श्री क्षेत्र वीर येथे दानशूर नाथ भक्तांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी देखील नेताजी बाबुराव धुमाळ (वाडकर) यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. असे विश्वस्त सुनिल धुमाळ यांनी सांगितले आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील श्रीनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती, आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या, यासाठी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ सल्लागार मंडळ व कर्मचारी यांनी सर्व व्यवस्था पाहिली आहे. राजेंद्र धुमाळ, अध्यक्ष वीर देवस्थान ट्रस्ट. यावेळी श्रावणात दोन अमावस्याा आल्यात शुक्रवारी दुपारपासून अमावस्याा सुरू झाल्याने, उद्याची म्हणजे शनिवारी उगवती पूजेची अमावस्या धरली आहे. तरी देखील शुक्रवारी अनेक भाविकांनी श्री नाथाच्या दर्शनाला गर्दी केली होती. अमोल धुमाळ, खजिनदार वीर देवस्थान ट्रस्ट.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments