पुरंदर तालुक्यातील शिवाजी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य नंदकुमार सागर सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पतसंस्थेचे अध्यक्षपदी प्राचार्य नंदकुमार सागर, उपाध्यक्षपदी पांडुरंग जाधव, मानद सचिव पदासाठी हनुमंत पवार यांची निवड झाली आहे. पतसंस्थेच्या 2025 -2030 या कालावधीसाठी पुणे येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुणे ग्रामीण येथे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, या तीनही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने, जगताप यांनी बिनविरोध निवड जाहीर केल्या. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदी जगताप, सचिव व माजी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी नवनिर्वातीचा सत्कार केला. याप्रसंगी आणि रुद्र देसाई, संजय शितोळे, संजय पाटील, अनिल वरवणे, संजय ससाणे, सोनाली देसाई, सिद्धार्थ झांजे यासह पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक सतीश पिसाळ, विठ्ठल कदम, पांडुरंग दुर्गाडे, राजेंद्र जगताप, रमेश बोरावके, शहाजी जाधव, प्रिया गायकवाड, विद्या कारंडे, राजेंद्र जाधव, मोहन निगडे, जीवन कड आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments