जागतिक डास दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी जनजागृतीची मोहीम सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद साबळे फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक डासदिनानिमित्त डासाचे संकट, जनजागृती प्रतिबंध व नियंत्रण या विषयावर माहिती व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुरंदर पंचायत समितीचे तालुका विस्तार अधिकारी प्रकाश चौरे मनाले की, डासाची उत्पत्ती थांबवायची असेल तर कोरडा दिवस पाळावा तसेच पाण्याची साठवणूक करू नका, गप्पी मासे पाळणे यासारख्या उपयोजना कराव्यात याप्रसंगी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विजय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी शिवाजी भोसकर, पुणे कार्यालय आरोग्य अधिकारी अनिल जाधव, फिरोज तांबोळी व संतोष भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विपुल धसाडे यांनी केले. प्राध्यापक सृष्टी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जनजागृती कार्यक्रम प्रा. डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments