Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवे घाटामध्ये महावितरण चे अधिकारी विपुल चौधरी यांच्यावर प्राण घातक हल्ला; आमदारांची नातेवाईकच सुरक्षित नाही तर त्या ठिकाणी सामान्यांचे काय? सासवड प्रतिनिधी: पुणे महावितरण मध्ये कार्यरत असलेले विपुल संतोष चौधरी यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी रात्री प्राण घातक हल्ला करण्यात आला, पुणे पंढरपूर मार्गावरील दिवे घाटात ही घटना घडली, बिलाची तपासणी आणि मंजुरी यावरून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे, याप्रकरणी एका ठेकेदारावर चौधरी यांनी संशय व्यक्त केला आहे, त्यामुळे पोलिसांच्या रडारवर हा ठेकेदार आलेला आहे, विपुल चौधरी हे विदर्भातील यवतमाळचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचे जावई आहेत, तिथे आमदारांचे नातेवाईकच सुरक्षित नसतील ,तर सामान्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, विपुल चौधरी दुचाकीवरून पुण्याहून सासवड कडे जात असताना दिवेघाटात एका दुचाकी वर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला, लोखंडी रोढणे त्यांच्या डोक्यावर दोन वार केले, पण हेल्मेट घातले असल्यामुळे, त्यातून ते बचावले डोक्यावर मारणे शक्य होत नसल्याचे, बघून त्यांनी रोडने पायावर वार करण्यात आले, यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे, दरम्यान चौधरी वरून खाली पडले, आणि जीव वाचवण्यासाठी धावत सुटले ,जवळपास 500 मीटर धावत गेले अशी माहिती त्यांची पत्नी विश्ववंती मांगुळकर- चौधरी यांनी दिली. हल्लेखोरांनी दुचाकीने त्यांचा पाठलाग केला, दरम्यान मागून आणखी दोन दुचाकी आल्यामुळे हल्लेखोरांनी त्या ठिकाणावरून पळ काढला, या संदर्भात फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये त्या आरोपीवर 273/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 117 (2), 126 (2 ),3( 5), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विपुल संतोष चौधरी (वय 32 वर्ष धंदा नोकरी )सध्या राहणार घर नंबर डी -५९३ सोपानगर महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे महाडा सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे) मुळगाव मुक्काम पोस्ट तामसवाडी तालुका पारवा जिल्हा जळगाव या ठिकाणीचे असून, सुद्धा सासवड या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने गुन्हा दाखल केला होता परंतु ,त्याचा सासवड पोलिसांनी सुद्धा कसोशीनेे चौकशी केली नाही, त्याचा परिणाम हा आता त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात यश या आरोपींना आले आहे, यामध्ये आरोपींनी लोखंडी रॉड ने त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, दिवेघाटाच्या मध्यभागी असलेल्या दुचाकी सायकलवरून, सासवडच्या दिशेने जात असताना, तीन अज्ञात इसमानी त्यांच्याकडे असणारी कालया रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल नंबर त्या ठिकाणी माहीत नाही, फिर्यादी यांचे गाडीला आडवी मारल्याने, फिरून यांनी त्यांना जाब विचारला असता, त्यातील पाठीमागे बसलेल्या दोन अनोळखी इसमानी, चौधरी यांना शिवीगाळ करत, त्यांचे हातातील लोखंडी रोडने त्यांच्या दोन्ही पायावर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे धोका झाल्यामुळे, फिर्यादी यांना सासवडच्या चिंतामणी हॉस्पिटल या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने सासवड या ठिकाणी व पुणे ग्रामीण पोलिसांच्या अन्वये सबब त्या आरोपीवर गुन्हा दाखल करून, पुढील तपासणीसाठी फुरसुंगी पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा वर्ग केल्याने, नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याचा पुढील तपास नानासो जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments