वाघीरे महाविद्यालयात “करिअर मार्गदर्शन कार्यशाळा व सामंजस्य करारचे” आयोजन सासवड प्रतिनिधी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील वाणिज्य व संशोधन विभागाच्या वतीने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून पुरंदर ऑफिसर चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे या संस्थेचे अध्यक्ष कुंडलिक कारकर , सचिव प्रा. सी.ए.डॉ.एम.एस.जाधव, कार्यकारी सदस्य प्रा. दिपक जांभळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे , डॉ. बी. एल. शिंदे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. किशोर लिपारे, डॉ. नरसिंग गिरी, तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक व २३५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. सी.ए.डॉ.एम.एस.जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याना करिअरच्या उपलब्ध असलेल्या संधींचे सविस्तर विश्लेषण केले. आजच्या स्पर्धात्मक युगात वाणिज्य शाखेतली विद्यार्थ्याना आयकर, जीएसटी, बँकिंग, विमा, सी.ए., सी.एस., इतर स्पर्धा परीक्षा, उद्योजकता व स्वयंरोजगार या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे, विद्यार्थ्याना नोकरी व व्यवसायामध्ये प्रचंड मागणी आहे परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्य व ज्ञान मिळवणे आवश्यक आहे त्यासोबत प्रचंड कष्ट करण्यची तयारी व आत्मविश्वास असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे दुसरे अतिथी कुंडलिक कारकर यांनी विद्यार्थ्यांनी करीअरसोबत आरोग्य, नितीमुल्ये, प्रामाणिकपणा या गुणांचा अंगीकार केला पाहिजे असे मत व्यक्त केले. यानंतर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना सदर व्याख्यानातून करिअरचा मूलमंत्र मिळाला असल्याचे नमूद केले, भविष्यात देखील या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, प्लेसमेंट, स्वयंरोजगार व उद्योजकता अशा विविध विषयांवर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित केली जातील असे प्रतिपादन केले. यावेळी पुरंदर ऑफिसर चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे आणि महाविद्यालयातील वाणिज्य विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला तसेच महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ग्रीन क्लब या उपक्रमाअंतर्गत प्रातिनिधिक विद्यार्थ्याना रोपट्याचे वाटप करण्यात आलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. नरसिंग गिरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. पूनम फडतरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामधील वाणिज्य विभागाने प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे केले. यासाठी डॉ.माधवी कामठे, डॉ.भाग्यश्री बोरावके, प्रा.पूनम फडतरे, प्रा. शुभम एक्के, प्रा. आकाश झेंडे, प्रा. पूजा शेलार, प्रा. तनया फडतरे, प्रा. शुभम ठोंबरे, प्रा. समीर कुंभारकर, प्रा. श्वेता राजीवाडे, प्रा. गौरी वाघमारे, प्रा. आदिती पवार, संतोष लोणकर, अंकुश धायगुडे गणेश खोडके यांचे सहकार्य लाभले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments