Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड नगरपरिषदेकडून अभय योजना थकबाकीदार मालमत्ता धारकासाठी शास्ती माफीची संधी सासवड प्रतिनिधी: सासवड शहरातील मालमत्ता धारकासाठी सासवड नगर परिषदेने सन 2025 -26 या आर्थिक वर्षासाठी विशेष कर वसुली मोहीम सुरू केली आहे, या मोहिमेअंतर्गत थकबाकीदार मालमत्ता धारकासाठी अभय योजना जाहीर केली आहे. यामुळे नागरिकांना मालमत्ता करा वरील थकीत शास्ती माफ करून, देण्याची संधी मिळणार आहे, सध्या सासवड शहरातील मिळकत धारकाकडे एकूण दोन कोटी 15 लाख रुपये शासकीय स्वरूपात थकीत आहेत, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 19 मे 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार मालमत्ता करा वरील शासकीय माफ करण्यासाठी, अभय योजना आणली आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांनी मालमत्ता कराची मूळ रक्कम पूर्णपणे भरून, अर्ज सादर करून, याचा लाभ घेण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. जोपर्यंत नागरिक वेळेवर कर भरत नाहीत, तोपर्यंत नगरपरिषद त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे, यामध्ये मालमत्ता सील करणे, नळ कनेक्शन बंद करणे, आणि जप्त मालमत्तेची विक्री करणे याचा समावेश आहे, तसेच थकबाकीदार मालमत्ता धारकांची नावे नगरपरिषद कार्यालयासमोर आणि शहरातील प्रमुख चौकामध्ये फ्लेक्स द्वारे जाहीर केली जाणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर, भरण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर तसेच बँकिंगच्या माध्यमातून, आरटीजीएस किंवा एन इ एफ टी आणि नगरपरिषद कार्यालयात रोख रक्कम किंवा क्यू आर कोड स्कॅन करण्याची व्यवस्था आहे, दरम्यान सन 2025- 26 ते 2029- 30 या वर्षासाठी सुरू असलेल्या इमारती किंवा भूखंडाच्या कर निर्धारण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवण्याची मुदत वाढवली असून, 22 ऑगस्ट 2025 पर्यंत आक्षेप अर्ज दाखल करता येतील. मुदतीनंतर आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही, अशीही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. कर वसुली हा नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे, या माध्यमातून मिळालेल्या निधीतून शहरांमध्ये विविध विकास कामे केली जातात, त्यामुळे नागरिकांनी वेळेवर कर भरून, प्रशासनाला सहकार्य करावे डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपालिका.

Post a Comment

0 Comments