Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावातून मंगेश लवांडे 35 वर्षीय विवाहित तरुण बेपत्ता; त्या व्यक्तीच्या संदर्भात जर काही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्यासाठी सासवड पोलिसांचे आवाहन सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावातून मंगेश लवांडे हे बेपत्ता झाल्याची भाग्यश्री मंगेश लवांडे (वय 33 वर्ष रा. सिंगापूर ता. पुरंदर जिल्हा पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, भाग्यश्री लवांडे यांनी सासवड पोलीस स्टेशनला हजर राहून, खबर दिली की, वरील ठिकाणी माझे पती मंगेश, सासू जनाबाई, सासरे प्रकाश, मुलगी मृण्मयी, मुलगा स्वरूप असे एकत्र राहत असून, पती शेती करून उपजीविका करतात, दि. 27 जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास माझे पती मंगेश हे घरातील किराणा घेऊन घरी आले व घरात ठेवून काही एक न सांगता, घरातून कोठेतरी बाहेर गेले, माझे पती रात्री उशिरा घरी यायचे, मला माय ग्रीन चा त्रास असल्याने, मी रात्री गोळ्या खाऊन, झोपले होते त्यानंतर पहाटे मला जाग आल्याचे, मी पाहिले असता, माझे पती मंगेश हे घरी आले नव्हते, त्यामुळे मी त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता, त्यांचा फोन बंद लागला, त्यानंतर सकाळी उठल्यानंतर देखील पती मंगेश यांचे मोबाईलवर फोन केला असता, फोन बंदच लागत होता, त्यामुळे मी माझे चुलत धीर तुषार कैलास लवांडे यांना फोन केला, पती बाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मंगेशची कार ही बोरवाडी येथे आपल्या शेतामध्ये गोडाऊन जवळ लावलेली आहे. चावी आत गोडाऊन मध्ये ठेवलेली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माझे पती मंगेश यांना फोन लावला असता, त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता, नंतर माझे दीर सौरभ लवांडे यांना फोन करून सांगितले की, पती मंगेश यांचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे विचारपूस केली असता, काही एक माहिती मिळत नाही. त्यानंतर 27 जुलै रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी गावातील ग्रामपंचायत सीसीटीव्ही मध्ये त्यांचा पंचकार पार केलेली दिसत होती, बोरवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी शिवशक्ती हॉटेलचे सीसीटीव्ही माझे धीर सौरभ लवांडे यांनी चेक केले असता, त्यामध्ये 28 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास आमची कार शेतामध्ये पार करून, पती रस्त्याने चालताना दिसले, परंतु ते अद्याप पर्यंत घरी न आल्याने, ते मिसिंग झाल्याची आमची खात्री पटल्याने, आम्ही आज रोजी सासवड पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग देणे करिता आलो आहे, माझे मिसिंग झाल्याचे पतीचे वर्णन खालील प्रमाणे, आहे वर्णन मंगेश प्रकाश लवांडे (वय 35 वर्ष व्यावसाय शेती रा. सिंगापूर ता. पुरंदर जिल्हा पुणे) रंग गोरा, उंची पाच फूट आठ इंच, केस काळे, बांधा -मध्यम, नेसणिस- पांढरे रंगाचा फुल शर्ट, काले रंगाची फॉरमॅट पॅट, पायात पांढरे रंगाचा शूज, भाषा मराठी बोलतात, जर कोणाला काही माहिती असल्यास, सासवड पोलीस ठा ण्यात संपर्क करावा असे आवाहन, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments