पुरंदर तालुक्यातील मावडी कडे पठार येथील जमिनीच्या वादामध्ये सख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा खून केला सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील मावडी कडे पठार (ता. पुरंदर जिल्हा पुणे )येथे दाजींरच्या शेतात बाजरीच्या पिकात इसम ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 80) हा मयत स्वरूपात आढळून, आला होता या प्रकाराबाबत जेजुरी पोलिसांकडून तपास सुरू होता, या तपासा अंतर्गत गोपनीय बातमीदारा मार्फत त्यांना अशी माहिती मिळाली की, संबंधित मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे याचा व त्याच्या सख्ख्या लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे या दोघांमध्ये जमिनीतील रस्त्यावरून, वाद होता त्या अनुषंगाने जेजुरी पोलिसांनी चांगदेव भामे या तपासा कामे अंतिम त्याची चौकशी केली असता, परंतु सुरुवातीला त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला, मात्र त्याला पोलीस खाकी दाखवताच त्यांनी;या खुणाची कबुली जबाब दिला, त्याने त्याच्या सख्या भाऊ ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा जमिनीतील रस्ता अडवत असल्याकारणाने, रस्ता देत नसल्याने, त्याला हाताने, लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली व त्यामध्ये डोक्यात मारहाण केली असल्याचे, त्यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जेजुरी यांनी देखील पोस्टमार्टम करत, त्या ठिकाणी सदर माहितीच्या आधारे डोक्यात गंभीर जखम झाले असल्याचे सांगितले. यावरून ज्ञानदेव लक्ष्मण भामे याचा खून त्याच्या सख्ख्या भाऊ चांगदेव भामे यांनीच केला आहे, असे उघडकीस आल्याकारणाने दोन ऑगस्ट रोजी त्याला जेजुरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार बारामती विभाग, उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, पोलीस हवालदार विठ्ठल कदम, पोलीस हवालदार मुनीर मुजावर, पोलीस हवालदार संदीप भापकर, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत भोंगळे यांच्या पथकाने केली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments