पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी हायस्कूल ला रोटरी क्लब कडून मदत सासवड प्रतिनिधी: सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मावडी पिंपरी हायस्कूल पिंपरी येथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या सहकार्याने शिक्षण उपयोगी साहित्य देण्यात आले. यामध्ये विद्यालयात दोन एलईडी टीव्ही संच तसेच स्वच्छता गृह सुविधांच्या भौतिक सुधारणेसाठी पेविंग ब्लॉक, हॅन्ड वॉश स्टेशन व इतर साहित्याची मदत करण्यात आली असून, यावेळी दहावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष महादेव शेंडकर होते, याप्रसंगी रोटरीयन रवींद्र भावे, सचिन मोरे हॅप्पी व्हिलेज संचालक, विश्वनाथ येरवा, प्रकाश मारणे, रायचंद गायकवाड आदी उपस्थित होते. या सर्वांचे मुख्याध्यापक शिवाजी कोलते यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, कर्मचारी, शिपाई आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments