Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवडच्या अश्विनी राठोड ची जलसंधारण अधिकारी म्हणून निवड.. माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते गौरव.... सासवड प्रतिनिधी: सासवड येथील अश्विनी विकास राठोडयांची राज्य शासनाच्या जल संधारण अधिकारी गट ब या पदावर निवड करण्यात आली आहे. सध्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणुन राठोड कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सासवड येथील तिच्या राहत्या घरी माजी आमदार संजय जगताप व अन्य मान्यवरांनी सत्कार करून तिचे अभिनंदन केले आहे. सासवड येथील वीर गोगादेव नगरात राहणाऱ्या अश्विनी राठोड हिचे माध्यमिक शिक्षण सासवडच्या वाघीरे विद्यालयात तर कोथरूड येथील एम आय टी कॉलेजमधूनतिने बी ई सिव्हिल पदविका प्राप्त केली आहे. तिचे वडीलविकास सुरेश राठोड सासवड नगरपालिकेत कर्मचारी असुन आई उषा गृहिणी आहे. सासवड येथील तिच्या सत्कार प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, श्री काळ भैरवनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश जगताप (कारभारी)माजी नगरसेवक सागर जगताप, सेवानिवृत नगरपालिकाअधिकारी मोहन चव्हाण, माऊली गिरमे, प्रवीण जगताप सुजित बडध्ये, दिपक जगताप, सुनिल राठोड, कैलास चव्हाण, मोहनअप्पा जगताप, प्रमोद म्हेत्रे , जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले, निखिल स्वामी व राठोड हिचे कुटुंबीय हजर होते . अश्विनी राठोड हिच्या यशाबद्दल सर्व थरातून तिचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments