पुरंदर तालुक्यातील दिवे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सासवड प्रतिनिधी: महसूल विभाग अंतर्गत, महाराजस्व अभियान अंतर्गत, उपविभागीय अधिकारी कार्यालय पुरंदर व तहसील कार्यालय पुरंदर यांच्या संयुक्त विद्यामाने, आयोजित असणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर स्थळ सरस्वती गार्डन मंगल कार्यालय सासवड हडपसर रोड काळेवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे येथे 4ऑगस्ट सोमवार या दिवशी वेळ सकाळी 10 ते 5 यासाठी दिवे, पवारवाडी, जाधववाडी, काळेवाडी, झेंडेवाडी येथील सर्व शेतकरी बांधवांनी यासाठी उपस्थित राहायचे आहे. यासाठी शिबिरामध्ये वाटप करण्यात येणारे दाखले, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, वय, राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, पी एम किसान शेतकरी ओळखपत्र, दुय्यम शिधापत्रिका देणे. यासाठी प्रमुख उपस्थिती विजय शिवतारे आमदार पुरंदर हवेली, श्रीमती वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार, श्रीमती सोनाली वाघ महसूल नायब तहसीलदार, श्रीमती शुभांगी गोंजारे निवडणूक नायब तहसीलदार, महादेव जाधव सांगायो नायब तहसीलदार, गोपाळ ठाकरे पुरवठा नायब तहसीलदार हे उपस्थित राहणार आहेत, या शिबिराची माहिती मंडलअधिकारी कांबळे सुहास व तलाठी सुतार भाऊसो यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments