कोडीत नाका सासवड येथील "पोथी वाचणारे बाबा " हे सासवड नगरपालिकेचे म्युरल दुसऱ्यांदा गायब सासवड प्रतिनिधी: सासवड नगरपालिकेने जनतेच्या पैशातून सासवड मध्ये अनेक ठिकाणी म्युरल उभी केली होती .त्यासाठी चौथरा बांधणे ,म्युरल खरेदी , वडाला ओटे बांधणे अशी वेगवेगळी टेंडर देऊन लाखो रुपये नगरपालिकेने खर्च केले आहेत .अशा म्युरल मधून नागरिकांना कोणतीच सोय अथवा सुविधा मिळत नाही. परंतु नगरपालिकेला स्वच्छतेचे बक्षीस मिळण्यासाठी ते सोईं सुविधा पेक्षा आवश्यक आहे.त्यातील "पोथी वाचणारे बाबा" हे दोनदा कोडीत नाक्या वर असलेल्या वडाच्या चौथऱ्याहून अचानक गायब झाले आहेत . चौकशी अंती असे समजले की यापूर्वी नगरपालिकेच्या गलथान कारभाराला स्वतः कंटाळून निघून गेले होते .परंतु यावेळी सासवडच्या जनतेला कंटाळून त्यांनी पोथीसह पलायन केले आहे .याची कारणे पुढील प्रमाणे सासवड मधील लोकांच्या दारी कचरा गाडी येऊनही लोक रस्त्यावर कचरा टाकतात . घरा भोवती स्वच्छता अथवा स्वतः च्या मालकीच्या बखळ जागाही नगरपालिकेने स्वच्छ कराव्यात अशी अपेक्षा असणारे नागरिकमुख्याधिकारी कायद्याचे काटेकोर पालन करून कब्रस्तान जवळील झोपडपट्टीच्या पूर्व बाजूस संरक्षक भिंत बांधू लागले की नागरिक रस्त्यावर आडवे पडून काम थांबवतात . झोपडपट्टीच्या एक बाजूचा बंद रस्ता मोकळा केला की पुन्हा तो गाड्या उभ्या करून बंद पाडायचा.कितीही वेळा पोलिस स्टेशनला तक्रार केली तरीही चक्री, गांजा, हातभट्टी अवैध शस्त्र विक्री थांबली नाही .उलट नवीन चक्री सुरू झाल्या आहेत. गावात भरमसाठ दारू आणि परमिट रूम झाले आहेत.कितीही प्लॅन मंजूर झाले तरीही नागरिकांचे अतिक्रमण! रस्त्यावर घरे बांधतात ,शेड उभे करतात,टपऱ्या उभ्या करतात. प्लॅन प्रमाणे घरे न बांधणे, वाढीव बांधकाम करणे.निवासी घरांच्या क्षेत्रात अनधिकृत बदल करून व्यावसायिक जागेत रूपांतर करतात , फुटपाथ हे चालण्यासाठी आहेत तरीही त्यावर गाड्या उभ्या करतात . सोपानदेवांच्या नगरीत अभंग ऐकू येण्या ऐवजी मोठ्या कर्णकर्कष्य आवाजात कानाचा पडदा फाटे पर्यंत गाणी ऐकावी लागतात.सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या नगरपालिकेच्या जागा ,मंदिरे ,उद्याने,शाळा ,इमारती, रस्ते ह्या खाजगी मालकीच्या असल्यासारख्या त्यांच्यावर ताबा प्रस्थापित करून त्याचा उपभोग घेणे. इतकी वर्ष सत्ता असणाऱ्या लोकांनीच आम्हाला सोई सुविधा मिळत नाहीत म्हणून मुख्याधिकारी यांना घेराव घालायचा .मुख्याधिकारी यांना येऊन ३वर्षे झाली नाहीत .आपली गेली ३०वर्ष एकच पक्षाची सत्ता आहे. त्यांना कोणीच प्रश्न का विचारत नाही? जर गेल्या ३०वर्षात सत्ता असून ड्रेनेजचा प्रश्न सोडवता येत नसेल तर मुख्याधिकारी ३ वर्षात प्रश्न सोडवावा ही अपेक्षा योग्य तर्तिक आहे का? सर्व नगरपालिका ठेक्यात चालते आणि ठेकेदार स्थानिक मग कचऱ्याचे ढीग ,रस्त्याचा दर्जा चांगला नाही ,भाजी बाजार रस्त्यावर भरतो ट्राफिकचा त्रास होतो .या तक्रारी ठेकेदाराच्या चुका आहेत.त्यांना प्रश्न न विचारता अथवा ज्या नगरसेवकांनी सभागृह असताना ठेके दिले,रस्ते बनवले त्यांना का हा प्रश्न विचारला जात नाही ?फ्लेक्स होर्डिंग्ज स्थानिकांनी लावायचे आपापल्या पक्षाची स्पर्धा करायची आणि दोष मुख्याधिकारी साहेबांचा कसा ? शिस्त ,स्वच्छता, नियमांचे पालन करणे ,शांतता सुव्यवस्था राखणे हे जसे शासनाची तशीच नागरिकांचीही देशाप्रती कर्तव्य आहे .प्रत्येक वेळेस व प्रत्येक ठिकाणी शासन मदत कसे करू शकते?वर्षानु वर्ष निवडून येणाऱ्या राजकीय पक्षाची सत्ता असताना नगराध्यक्षांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केलेली आठवत नाही.वाहनतळ नाहीत,दर्जेदार शाळा नाहीत,पिण्याचे पाणी नाही की स्ट्रीट लाईट नाही अरुंद रस्ते आणि त्यावर टपऱ्याच टपऱ्या! मागील सत्ताधाऱ्यांनी केले काय?नगरपालिकेचा टॅक्स बुडवण्यासाठी खोटे भाडे करार सादर करणे .व्यापारी उद्देशाने लाईट वापरून घरगुती मीटरचे बिल भरणे. नळाचे मीटर बंद ठेऊन अमाप पाणी वापरणे व मोटरने ओढणे .नगरपालिकेत पैसे येणार कुठून आणि सोई देणार कशा ?जो पर्यंत हे शहर माझे आहे ते स्वच्छ सुरक्षित सुंदर ठेवणे माझे कर्तव्य आहे या नगरपालिकेच्या वस्तू आणि वास्तू या आम्हा सर्वांच्या मालकीच्या आहेत .गावातील रस्ते ,सार्वजनिक जागा चांगल्या ठेवणे ही माझी जबाबदारी आहे याची जाणीव नागरिकांना होत नाही . याचा मनस्ताप होऊन पोथी वाचणारे बाबा पोथीसह गाव सोडून कायमचे निघून गेले आहेत. कदाचित त्यांनी कऱ्हा नदीत पोथीसह वाहून गेले असावेत असे वाटते .पोलिस स्टेशन मध्ये missing कंप्लेंट देणे गरजेचे आहे .डॉ. उदयकुमार वसंतराव जगताप यांनी प्रतिनिधी ला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments