सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी आमदार संजय जगताप ;तर सासवडचा पुरस्कार हा मॅनेज नाहीच तर सासवडकरांच्या मेहनतीचा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरांमध्ये आधुनिक अशी सुव्यवस्था व सर्व सुविधांनी युक्त असे स्वप्ननगरी असणारी सासवड हे प्रमुख शहर असून, सासवडला स्मार्ट सिटी सारखे विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी स्वत: गळ घालणार आहे ,सासवडचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी व संजय जगताप पूर्णपणे कटिबद्ध असून ,त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी आमदार संजय जगताप हे सासवड साठी खंबीरपणे साथ देणार आहेत ,असे निवडणूक प्रचार सभेमध्ये त्यांनी सांगितले .सासवड ता. पुरंदर येथे प्रचार सभेसाठी चव्हाण आले असता ,त्यावेळी ते बोलत होते ,पुढे चव्हाण बोलताना म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची धडाडी दिसून येत असून ,भाजप जनसेवा व पारदर्शक प्रशासन आहे असे, वृद्ध घेऊन काम करत आहे ,काहीजण निवडणुकीच्या काळामध्ये खोटी आश्वासने देत असून ,भाजप विकासाच्या कामावर विश्वास ठेवतो, नागरिकांना विक्रमी मताधिक्याने सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जेजुरी व सासवड येथे स्पष्टपणे केले. सासवडचा जर सर्वांगीण विकास करायचा ,झोपडपट्टी मुक्त शहर आणि आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी आपले पुढील उद्दिष्ट असून ,त्यासाठी स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या विचाराचा अनुसरून एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार संजय जगताप यांनी निवडणूक प्रचार सभेमध्ये केले की, जगतापुढे म्हणाले ,स्वर्गवासी चंदुकाका जगताप यांनी सर्वसामान्य साठी आयुष्यभर काम केले असून, त्यांच्या विचारावर आधार घेऊन आपण प्रत्येक प्रभागातून आपला नगरसेवक निवडून द्यावा ,सासवड नगरपरिषद देशातील ही सर्वाधिक स्वच्छ नगरपरिषद ठरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी अनेक मोठे योजना मंजूर केलेल्या असून, मुख्यमंत्र्यांनी सासवडसाठी १४२ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली आहे, पिंपळे आणि वाघ डोंगर येथे प्रत्येकी दोन कोटी लिटर क्षमतेचे साठवण तलाव उभारले जाणार आहेत ,गॅस पाईप लाईन, पाणी व गटारी योजना या तिन्ही लाईन भूमिगत टाकण्याचा रस्त्याच्या दुरुस्तीच्या डीपीआरही अंतिम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, एक वर्षापासून जेजुरी आणि सासवडच्या पाणी प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर दिली गेली नाही ,तसेच मागील काही महिन्यात काहींच्या निष्क्रियतेमुळे शहराची नियोजन बिघडण्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अनेक अधिकारी आणि महापौरांनी सासवडला भेट देत प्र गतीची पाहणी केली असून ,जलद गतीने कामे पूर्ण करावयाची आहे. असेही जगताप म्हणाले.आमदार योगेश टिळेकर बोलताना पुढे म्हणाले की ,सासवडचा जो काही पुरस्कार मिळाला आहे तो मॅनेज करून नाही तर सासवड करांच्या मेहनतीचा आहे ,सासवड शहर आणि देश पातळीवर मिळवलेला स्वच्छतेचा पुरस्कार हा सासवडकरांच्या सफाई कर्मचाऱ्यांचा एकत्रितपणा मुळेच हा पुरस्कार मिळालेला असून, कुणीही त्यासाठी गालबोट लावण्याची गरज नाही ,सर्व जनता हे पहात आहे. अमृत दोन योजनेतील विलंबावर टीका सुद्धा सासवडच्या पाण्यासाठी अमृत दोन अंतर्गत योजना मार्गी लावली जात असून ,दोन मोठे साठवण तलाव होणार आहेत, दुष्काळी काळातही शहराला पुरेसा पाणीपुरवठा करता येणार होता ,परंतु ऑक्टोबर मध्ये या योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू करायची होती ,यासाठी या ठिकाणच्या पुरंदर मधील महाशयनी पूर्ण एक वर्ष वर्क ऑर्डर देण्यात वेळ घालवला ,तर कोरोनात किती पैसा गोळा केला आणि कुठे खर्च झाली स्वच्छतेच्या बक्षिसाचे साडेबारा कोटी रुपये कुठे गेले हे प्रश्न शिंदे गटाचे उमेदवार करत आहेत, त्यासाठी ग्रामीण संस्थेमार्फत खळद व उरुळी देवाची या ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी करून ,त्या माध्यमातून 1300 हून अधिक रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यात आले, ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून दोन महिने डॉक्टरांना आरोग्य केंद्रावर सोबत दोन बायोटेक व्हेजिटेबल मशीन व 25 थर्मल गन देखील उपलब्ध करून देण्यात आल्या, दररोज 5000 लिटर आधुनित दूध पूर्णपणे मोफत देण्यात आले, आरोग्य कर्मचारी अधिकारी स्वयंसेविका यांना बाराशे पीपीएफ चे वाटप तर 95 दर्जाचे 3000 मास्कचे वाटप, 15, 500 सॅनिटायझर ग्रामपंचायत आरोग्य केंद्र इतर यांना वाटप 3000 घरगुती कुटुंबियांना किराणा वाटप कीट, करण्यात आले .वीस हजार कापडी मास तयार करून ते वाटप करण्यात आले .आरसेनिकम अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे 80 हजार कुटुंबांना वाटप करण्यात आले, कोरोना काळामध्ये 91 दिवसाहून अधिक दररोज 18000 जेवणाची आनंदी थाळी वाटप करण्यात आली, तर कोरोना मध्ये तुमचा नेता म्हणजेच शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार हे कुठे होते ते पहिले त्यांच्या उमेदवारांनी त्याचे स्पष्ट करावे, कोरोणा मध्ये किती पैसा गोळा केला आहे प्रश्न उमेदवार जर विचारत असतील व खर्च विचारत असतील तर त्यासाठी ग्रामीण संस्थेच्या खळद व उरुळी देवाची या ठिकाणी कोविड सेंटरची उभारणी करून कोविड सेंटरच्या काळामध्ये तेराशे हुन अधिक रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार देण्यात आले ग्रामीण संस्थेच्या दोन महिने डॉक्टरांचा आरोग्य केंद्रावर सेवा देण्यासाठी केलेले रुजू सोबत दोन बायोटेक व्हॅलीत लेटर मशीन 25 थर्मल गन देखील उपलब्ध करून देण्यात आल्या दररोज 5000 लिटर आनंदी दूध पूर्णपणे मोफत देण्यात आले आरोग्य कर्मचारी प्रशासकीय अधिकारी पोलीस अशा स्वयंसेवीका यांना ,कोरोना काळामध्ये या सुविधा देण्यात आल्या स्वच्छतेच्या बक्षिसाच्या साडेबारा कोटी रुपयाचा तुम्ही हिशोब विचारताय ना तर त्याचे उत्तर असे सासवडचा पुरस्कार हा तीन ते चार वेळा मिळालेला तो मॅनेज करून नाही तर मेहनतीच्या बळावर सासवडकर यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नगरपरिषदेच्या यांच्यावर तो मिळालेला आहे. कुणाला असा पुरस्कार मॅनेज करून पैसे देऊन मिळत नाही तर त्यासाठी कष्ट करावे लागतात ,असेही टिळेकर आमदार यांनी ठणकावून सांगितले .आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटनेचे दौलत नाना शितोळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे निरीक्षक राजेश पांडे, आमदार विक्रांत पाटील ,माजी आमदार अशोक टेकवडे ,गंगाराम जगदाळे, शेखर वढणे,गिरीश जगताप ,आनंद भैय्या जगताप, मार्तंड भोंडे आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदासाठी आनंदी काकी जगताप ,नगरसेवक पदासाठी सारिका हिवरकर, मनोहर जगताप, लिना वढणे, दिनेश भिंताडे, शितल भोंडे ,ज्ञानेश्वर जगताप, सोपान रणपिसे, स्मिता जगताप ,मोनिका मेत्रे, मयूर चौखंडे ,अर्चना जगताप, राजन जगताप ,अस्मिता जगताप, प्रवीण पवार ,सुहास लांडगे ,सुमाली राऊत, प्रदीप राऊत ,प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, दिप्ती सूर्यवंशी, अजित जगताप यांच्या प्रचारासाठी हे सर्व नियोजन केलेले होते. आभार प्रदर्शन सागर जगताप यांनी मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments